Headlines

आता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या

[ad_1]

The Kerala Story In Marathi: विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला. त्यानंतर ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. नुकताच या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला. त्यामुळे आता चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होईल, याची प्रतिक्षा लागली आहे. मात्र या चाहत्यांसाठी प्रतिक्षा संपणार असून, लवकरत हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. 

 ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील 32000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर तो लव्ह जिहादमध्ये अडकला आणि त्यांना सीरियाला पाठवण्यात आलं, तिथे त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली.

कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झी 5 ला ‘द केरळ स्टोरी’चे डिजिटल अधिकार मिळाले आहेत. लवकरच हा ब्लॉकबस्टर चित्रपट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र चित्रपटाची ओटीटी रिलीजची तारीख अद्याप समोर आलेली नाही. तसेच निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण जेव्हा OTT वर चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा तो सिनेमागृहाप्रमाणे OTT वर धुमाकूळ घालू शकतो. 

‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले तर निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली. अभिनेत्री अदा शर्मासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जवळपास 200 कोटींची कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्य घटनांवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पश्चिम बंगालमध्येच या चित्रपवारवर बंदी घालण्यात आली होती. अशी टीका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. 15 ते 20 कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटांनी 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ही चर्चा देशातच नाही तर जगभर होताना दिसत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *