Headlines

“आता कोणतेही काम नाही, संजय राऊतांना तारे तोडू द्या,” भाजपा खासदार अनिल बोंडेंची बोचरी टीका | bjp leader anil bonde criticizes sanjay raut said let him talk maharashtra government is doing well

[ad_1]

सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. तर दुसरीकडे हे सरकार अवैध मार्गाने स्थापन झालेलं आहे, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. असे असताना आता भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. संजय राऊतांना सध्या कोणतेही काम नाही, त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तारे तोडू द्या, असा टोला बोंडे यांनी लगावला आहे.

हेही वाचा >>> भावना गवळी, संजय राठोड यांना धक्का; शिवसेनेने केली मोठी कारवाई

“संजय राऊत यांना काही दिवस तारे तोडू द्या. त्यांना आता काही काम नाही. त्यामुळे त्यांनी तारे तोडायला काही हरकत नाही. संजय राऊतांनी शिवसेनेचा घात केला. ते जितके बोलतील तितके लोकांच्या मनातून उतरतील. संजय राऊत यांना पाहिलं, की लोक टीव्ही बंद करतात. या महाराष्ट्राला अतिशय चांगले, लोकांच्या मनातील संपूर्णत: संवेदनशील असणारे सरकार मिळाले आहे,” असे अनिल बोंडे म्हणाले. टीव्ही ९ मराठीने तसे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवलं, त्यांचे खरोखर आभार,” आमदार अमोल मिटकरींचा टोला

मागील काही दिवसांमध्ये शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावरही बोंडे यांनी भाष्य केले. “काय संविधानिक आहे काय असंविधानिक आहे, हे घटनातज्ज्ञ सांगतील. मात्र हे मंत्रिमंडळ लोकांच्या मनातील आहे. झपाट्याने निर्णय घेतले जात आहेत. मंत्रिमंडळाच्या दोन बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीचे निर्णय घेण्यात आले. हे सरकार संवेदनशीलपणे आणि वेगाने काम करणारे आहे. मंत्रिमंडळ विस्तार सावकाश करण्यात येईल,” असे अनिल बोंडे म्हणाले.

हेही वाचा >>> “संजय राऊतांनी पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरेंना एकत्र आणावं”; दिपाली सय्यद यांचे आवाहन

“राज्य मंत्रिमंडळात सध्या दोघे असताना ताकदीने आणि वेगाने काम सुरु आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्र पाठीमागे राहिला आहे. अधिकारी सुस्तावले होते. आता ते सक्रिय झाले आहेत,” असे म्हणत बोंडे यांनी शिंदे सरकारकडून आगामी काळात जनहिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *