Headlines

“आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”; महायुतीबाबत मनसेचं सूचक वक्तव्य | raju patil react on bjp shinde camp and mns alliance and shrikant shinde visit mns office ssa 97

[ad_1]

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आयोजनातून दरवर्षी शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा-शिंदे गट युती होणार असल्याचं बोललं जात आहे.

त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी ( २३ ऑक्टोंबर ) डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला भेट दिली आहे. श्रीकांत शिंदे हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. मात्र, त्यांनी डोंबिवली कार्यालयाला भेट दिल्याने युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व प्रकरणावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : …ती बँकच अस्तित्वात नाही, शरद पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठा खुलासा; म्हणाले “हे तर लबाडाच्या घरचं आवतण”

“श्रीकांत शिंदे यांनी आमच्या शहराध्यक्षाच्या विनंतीला मान देत कार्यालयाला भेट दिली. आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी, दुश्मन नाही आहोत. शिंदे गट आणि भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतीत. स्वतंत्र निवडणूका लढण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आमची तयारी सुरु आहे. मात्र, त्यांनी सांगितलं भविष्यात युती करायची, त्यालाही आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळली आहेत, बाकी सर्वही जुळून येईल,” असेही राजू पाटील यांनी स्पष्ट केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *