Headlines

aaditya thackeray on jitendra awhad arrested over har har mahadev case ssa 97

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह बंद पाडला होता. तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि प्रेक्षकांत झटापट झाली होती. याप्रकरणात आव्हाड आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी ( ७ नोव्हेंबर ) रात्री ११ वाजता ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात असलेल्या प्रेक्षकांना हुसकावून लावल्याने वाद झाला. यामुळे ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या १४१, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांना अटक होताच मनसेची प्रतिक्रिया; म्हणाले, “आयुष्यभर जेलमध्ये…”

त्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेत अटक केली आहे. यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावर शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “जितेंद्र आव्हाड यांनी बरोबर केलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही पण जेलमध्ये जाण्यास तयार आहोत,” असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

अटकेनंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

अटकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, “आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.”

हेही वाचा : विश्लेषण: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेपर्यंत पोहोचला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ; नेमकं काय आहे प्रकरण?

“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” असंही आव्हाड म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *