Headlines

आधी पत्नी- मुलगी, नंतर मुलावर गोळीबार; ‘या’ अभिनेत्याच्या वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल लवकच ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) या चित्रपटात दिसणार आहे. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. काजोलच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी 90 च्या दशकात सुपरस्टार मानली जाणारी व्यक्ती नजरेसे पडली आहे. ती व्यक्ती म्हणजे अभिनेता कमल सदाना (Kamal Sadanah) आहे. 1992 साली ‘बेखुदी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये काजोलसोबत कमलनं पदार्पण केलं. तब्बल 30 वर्षांनंतर कमल पुन्हा काजोलसोबत ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसणार आहे.

‘बेखुदी’नंतर कमल दिव्या भारती यांच्यासोबत ‘रंग या चित्रपटात दिसल्या होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि कमल रातोरात स्टार झाले. कमल यांनी त्यांच्या एका दशकाच्या करिअरमध्ये 15-16 चित्रपट केले आहेत. त्यानंतर ते बऱ्याच वर्षांनी एकता कपूरच्या ‘कसम से’ मालिकेत दिसले.

जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण –

कमल यांचे वैयक्तिक आयुष्यातही अनेक अडचणी होत्या. त्यांच्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशी अशी घटना घडली की ते कधीच विसरू शकत नाही. कमल यांच्या वडिलांनी आई आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या होत्या. खरंतर कमल आणि त्यांच्या घरातील इतर लोक हे वाढदिवसाच्या तयारीत होते. इतक्यात कमल यांना त्यांच्या घरातील दुसऱ्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. 

गोळ्यांचा आवाज ऐकून कमल सगळं सोडून त्या खोलीच्या दिशेने धावत गेले. कमल यांनी त्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांचे वडील अनियंत्रितपणे बंदुकीने गोळीबार करत होते. वडिलांनी झाडलेल्या गोळीने आई सईदा खान आणि बहीण नम्रता यांचा मृत्यू झाला. कमलला पाहताच वडिलांनी त्याच्यावरही गोळीबार केला.

who is actor kamal sadanah and his tragic life father shot mother and sister

कमल हे नशीबवान होते आणि ते बचावला. गोळी त्याच्या मानेच्या बाजूने गेली. मात्र, कमल बेशुद्ध पडले. कमल यांचे डोळे उघडले तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्यांना कळलं. त्यांनी वडील, आई आणि बहिणीची चौकशी केली तेव्हा सत्य समजल्यावर त्याला आणखीनच आश्चर्य वाटले. (who is actor kamal sadanah and his tragic life father shot mother and sister) 

शुद्धीवर आल्यानंतर कमलला सांगण्यात आले की,पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर कमलचे वडील ब्रिज सदना यांनी स्वत: वर गोळी  झाडली. कमल बेशुद्ध झाल्यानंतर वडिलांचा तोल सुटला आणि त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एका मुलाखतीत याचा उल्लेख करताना कमल यांनी सांगितले की, मला अजूनही कळत नाही की वडिलांनी असे पाऊल का उचलले आहे.

कमलच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची किंवा पैशाची कमतरता नव्हती किंवा कुठे लॉस झाला नव्हता. एवढंच काय तर कौटुंबिक समस्याही नव्हत्या. कमल यांचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते होते आणि त्यांनी ‘दो भाई’, ‘ये रात फिर ना आएगी’, ‘उस्तादों के उस्ताद’, ‘व्हिक्टोरिया नंबर 203’, ‘प्रोफेसर प्यारेलाल’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

या अपघातानंतर दोन वर्षांनी कमलनं ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यांना यश मिळालं नाही. मालिकेतून पूनरागमन केल्यानंतरही ते प्रेक्षकांच्या पसंतसी उतरले नाही. त्यानंतर कमल यांनी चित्रपटाची निर्मित करण्यास सुरुवात केली. आता ते काजोलसोबत ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *