Headlines

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचं शरद पवारांच्या बारामतीकडे लक्ष, फडणवीस म्हणाले “त्या १६ मतदासंघात…” | BJP Devendra Fadanvis on Nirmala Sitaraman Baramati Visit NCP Sharad Pawar sgy 87

[ad_1]

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात निर्मला सीतारामन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संघटनात्मक बैठकाही त्या घेणार असून यानिमित्ताने भाजपाने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘घरी बसा म्हणणाऱ्या’ अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “फक्त राजकारणासाठी…”

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात बैठका सुरु असल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले “भाजपाने गेल्या सहा महिन्यांपासून १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचाही मतदारसंघ होता. पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना-भाजपा आता युती म्हणून लढणार आहेत. जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल. आम्ही आमचा पक्ष मजबूत केला तरी आमची सर्व शक्ती सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या सर्व खासदारांना निवडून आणण्यासाठीही खर्ची घालणार आहोत”.

..तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची गरज नाही, त्या दोघांनीही घरीच बसावे – अजित पवार

“या १६ मतदारसंघात बारामती मतदारसंघही आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत आम्हाला तिथे चांगली मतं मिळाली होती. या १६ मतदारसंघाला केंद्रीय भाजपाने प्रभारी म्हणून केंद्रीय नेते दिले आहेत. निर्मला सितारमन यांना बारामती मतदारसंघ दिला आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीला येतील,” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

कसा असेल सीतारामन यांचा दौरा –

सीतारामन १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान भाजपाच्या देशभरातील ‘प्रवास’ मोहिमेचा एक भाग म्हणून बारामती शहर आणि लोकसभा मतदारसंघांतर्गत इतर विधानसभा क्षेत्रांना भेट देतील, असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भगडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. भाजपने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

१४४ मतदारसंघांपैकी, भाजपाने महाराष्ट्रातील १६ लोकसभेच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी दोन जागा पुणे जिल्हातील बारामती आणि शिरूर या आहेत. या मोहिमेसाठी भाजपाने केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेत्याला ‘प्रवास मंत्री’ म्हणून नियुक्त केले आहे.

डॉ. निर्मला सीतारामन १५ ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये दाखल होतील. खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा त्या आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर त्या बैठक घेणार आहेत. धायरी येथील एका मंगल कार्यालयात त्या खडकवासला मतदारसंघाअंतर्गत बैठक घेतील, अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली. सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. शिरूरचे लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *