Headlines

पावसाळ्यातील रोगराईला वेळीच रोखण्यासाठी तातडीने मनपा ने उपाययोजना कराव्या – शरद गुमटे

सोलापूर (प्रतिनिधी) – पावसाळ्याची पुर्व तयारी म्हणुन दुषित पाण्यापासुन होण्याऱ्या  रोगापासुन वाचण्यासाठी मेडिक्लोर -ए्म या लिक्विड चे वाटप करण्यात यावे, अशी मागणी उत्तर सोलापूर युवक काँग्रेसचे चे सरचिटणीस शरद घुमटे यांनी केली.

          ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की 1 जुन पासुन पावसाळा सुरु झाला आहे. याचं काळात कोरोनाच्या संकटाचा सामना सोलापूरकर करत आहेत. सोलापूरच्या जनतेची काळजी घेणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे.सोलापुर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे धरण व तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे.त्यामुळे मृत पाणीसाठ्याचा  उपसा सुरु होतो आहे.हे पाणी जरी फिल्टर करुन दिले जात असले तरी पाईपा तुन घरातील नळापर्यत जाई पर्यत पाण्यात कचरा,घाण जाते.त्यामुळे पावसाळ्यात शुध्द पाणी सोलापुरच्या जनतेला मिळणे गरजेचे अाहे.त्यामुळे हे लिक्विड वाटप केल्यास पाण्यातील जंतु कचरा दुर होतो अणि पाण्यापासुन होणारे आजार देखील दुर होतील.या बाबत महानगरपालिकेतील संबंधीतास मेडिक्लोर -ए्म या लिक्विड चे वाटप करण्याबाबत आदेश द्यावेत. अशी विनंती शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस शरद गुमटे यांनी मनपा आयुक्ता कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *