Headlines

कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावे – रुग्ण हक्क परिषदेची मागणी

निवेदन स्वीकारताना बार्शी तहसील कार्यालयाचे कर्मचारी

प्रतिनिधी (बार्शी)- कोरोनाग्रस्त रुग्णांचा संपूर्ण खर्च सरकारने करावा असे निवेदन  रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, बार्शी तालुक्यातून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना तहसीलदार याचे मार्फत दिले आहे.या निवेदनात  कोरोना पेशंटचा खर्च सरकारने करावा. आजपर्यन्त ज्या रूग्णानी  कोरोनाचे उपचार घेतांना बिले भरली त्यांना त्यांचे पैसे परत मिळावे.सर्वप्रकारचे दवाखाने, खाजगी व धर्मदाय हाॅस्पीटलमध्ये कोरोनावरील उपचार नागरीकांना मोफत मिळालाच पाहीजे.जीवनावश्यक वस्तु खरेदी साठी व घर चालविण्यासाठी प्रत्येक कुटूबांसाठी 10000/₹ द्यावे. कोरोनाची चाचणी व तपासणी मोफत झालीच पाहीजे.सर्व प्रकारच्या उद्योग व व्यवसायांना गती देऊन आर्थिक उत्पादनाचे स्त्रोत तातडीने सुरू झालेच पाहीजेत.या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देताना यावेळी रुग्ण हक्क परिषद बार्शी तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे गुळपोळी उपाध्यक्ष अमर प्रशांत हिंगे व रेखा सूर्यकांत चिकणे उपस्थित होते.

https://absnewsofficial.blogspot.com/2020/06/MFJAY.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *