Headlines

धर्मा धर्मात वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यात देहूकरांनी घातलं अंजन; मुस्लिम बांधवांनी सजवला तुकोबांच्या पालखीचा रथ

[ad_1]

Kiran Mane : भेदाभेद अमंगळ…! असं संतमंडळी म्हणतात… याचीच प्रचितीच आषाढी वारीच्या निमित्तानं आली आहे. हे पाहता लोकप्रिय मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी नुकतीच संत तुकारामांच्या पालखीबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन संत तुकारामांची पालखी सजवत असल्याचे दाखवले आहे. त्या फोटोंमध्ये ही पालखी सजवण्याचे काम मुस्लीम बांधव करत असल्याचे पाहायवला मिळत आहे. हा फोटो शेअप करत किरण माने म्हणाले  तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी!

पुढे किरण माने म्हणाले “देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो. असं या कारागीरांचं म्हननं हाय. रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली… तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करण्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हॉट्स् ॲप फॉर्वर्डमधी नाय गड्याहो.

आजच्या नासलेल्या भवतालात, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आणि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय ! देहूमधील हे चित्र पाहता श्री संत एकनाथ यांच्या “एका जनार्दनी निजवद अल्ला । असल वोही विट पर अल्ला”, या ओळी आठवतात. किरण माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हेही वाचा : शुभमनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये क्रिकेटरशी लग्न करण्याबाबत Sara, म्हणाली…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या चौध्या पर्वात किरण माने घरी पोहोचल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रावरंभा’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटात त्यांनी हकीम चाचा ही भूमिका साकारली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *