Headlines

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

 सोलापूर दि. 15 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
 सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस इतर अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्तेदेखील आपत्कालीन परिस्थितीत मदत करीत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळावे. खूप महत्त्वाचे काम असल्यावरच नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दीच्या ठिकाणी न जाता आपले काम उरकून लवकर घरी जावे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, रुमाल बांधून व हाताला हॅन्ड ग्लोज लावूनच घराबाहेर पडावे. वेळोवेळी शासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी म्हटले आहे.
कुटुंबातील व समाजातील वृद्ध, माता-पित्यांची तसेच लहान बालकांची सर्वांनी काळजी घ्यावे. कमी आजार असतानाच डॉक्टरांना दाखवून योग्य औषधोपचार घ्यावा. लवकर निदान झाल्यास आजारातून मुक्त होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःलाच शिस्त लावून कोरोनाच्या या महामारी विरोधात लढा देण्यासाठी समाजाला व शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *