Headlines

काहीच महत्वाचं नाही

काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी मजुरांना पायी चालताना त्यांचे हाल पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी भुके ने मेलेले शव पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी पोटशी असलेल्या एका आई चे दुःख पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी लहान अनाथ मुलांची कसरत पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी रोगात ही जातीवाद पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी गरीब श्रीमंत भेद पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी माणसातील स्वार्थ पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा महामारीत ही मी राजकारण पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा दुकानदाराने ही अति भावा ने दिलेला माल पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा शेतकऱ्याच पीक रस्त्यावर पडलेल पाहतो
काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा
जेंव्हा मी माणूस दैत्या सम वागताना पाहतो
साहिल-ऐ-युसूफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *