Headlines

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

सोलापूर,दि.19- सोलापूर शहरामधील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील झोन क्रमांक 2 येथील किसान संकुल, विडी घरकुल, तुलशांती नगर तसेच झोन क्रमांक 3 मधील एकता नगर येथे आज जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व  महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील नागरिक आणि आरोग्य सेवकांकडून माहिती जाणून घेतली.
          यावेळी प्रभागातील नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार हंचाटे, विठ्ठल कोठे, नगरसेविका कुंमुद अंकाराम, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगर अभियंता संदीप कारंजे,  अधिकारी नीलकंठ मठपती, शकील शेख आदी उपस्थित होते. प्रतिबंधित ठिकाणी सर्व्हे करत असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी परिस्थितीची माहिती घेतली. सर्व्हे करणाऱ्या कर्मचारी यांना काही अडचणी आहेत का? याची विचारपूस केली. तसेच या भागात सारी व कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्या भागातील जेष्ठ नागरिकांची तपासणी लावकरात लवकर करण्यात यावे, तसेच त्यांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात यावे, जेणे करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल, असे सांगितले.
          कंटेन्मेंट झोनमध्ये फवारणी करणेबाबत तसेच मास्क, साबण वाटप, जंतुनाशक फवारणी करण्यात यावी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी अधिकाऱ्यांना दिली. या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक यांनी भागातील काही अडचणी संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर आणि आयुक्त तावरे यांनी दिली. यावेळी आरोग्य विभागाचे व मनपा अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *