Headlines

अंगणवाडी शिक्षिका शिवलिला यांचा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा

अक्कलकोट / प्रतिनिधी – सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे.अशा जीवघेण्या कोरोनापासून गाव पातळीवर संरक्षणाचे काम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर वर आहे. यामध्येच प्रतिवर्षी प्रमाणे शिवलिला दोडमनी मॅडम यांचा वाढदिवस आला.नुकताच काही महिन्यापुर्वी त्यांचा साखरपुढा झालेला आहे.त्यांचे होणारे पत्ती जयकुमार सोनकांबळे असुन त्यांचे शिक्षण बी.ए, एम.ए, बी.एड झालेत.शिवलिला मॅडम चे शिक्षण डी.एड, बी.ए झाले असुन ते अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुकामधील चलगेरी या गावी कार्यारत आहेत.ते दोघे ही उच्च शिक्षित,उच्च विचारसरणी व साधा राहणीमान आहे.आपल्या प्रिय बायकोचा वाढदिवस जरा हटके आणि एकदम उत्साहात साजरा कराण्याचा ठरवले होते.पण शिवलिला मॅडमने आपल्या वाढदिवसाचा खर्च समाजाच्याच कामी यावा असे मत व्यक्त केले.म्हणुन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “आपणही समाजाचं काही देणं लागतो” या उदान्त हेतूने त्यांचा उच्च शिक्षित असलेला होणाऱ्या नवरदेवाने त्यांच्या वतीने जि.प.शाळेत काॅरटाईन असलेल्या लोकांना,चालत जाणाऱ्या मजुराना,कामगाराना असे अनेक गरजू लोकांना अन्न-धान्य,पाणी व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
      ह्या कोरोनाच्या महामारीत आपण देखील अश्या प्रकारची लाख मोलाची मदत करून ह्या वैश्विक महामारिचा पराभव करावा असे आव्हान शिवलिला दोडमनी व जयकुमार सोनकांबळे यांचा वतीने करण्यात आले.सोनकांबळे परिवार हे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यास अग्रेसर असतात.ही त्यांची विशेष खासीयत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *