Headlines

कोरंन टाईन युवकांचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी –  मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,हुलजंती येथे विलीनीकरण कक्षामध्ये याच गावातील परंतु बेरोजगार म्हणून राहाण्यापेक्षा उपजीविका करण्यासाठी मुंबई पुणे सातारा यासारख्या ठिकाणी, प्रा, कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेलेले व सध्या जगामध्ये कोरोना (covid-19) या विषाणूने महामायेचे थैमान घातले आहे, यामुळे आपल्या माय भूमी गावाकडे आलेल्या सहा युवकांनी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा हुलजंती येथे शासकीय कोरोना नियमानुसार 14 दिवसांसाठी जि प प्राथमिक शाळा येथे कोरंनटाईन करण्यात आले आहे. त्या दरम्यान या युवकाकडून आपण या शाळेत शिकलो मोठे झालो.तेव्हा आपल्या शाळेचे काही तरी देणे आहोत अशी भावना मनामध्ये येऊन. दोन दिवस कष्ट करून शाळा पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गेली दोन-अडीच महिने झाले शाळा बंद असल्याने अत्यंत भयावह कचरा जाळी झाली होती. ती पूर्णतः स्वच्छ करण्यात आल्या.कोरोना महामारी विषाणू बाबत रांगोळीतून संदेश देण्याचे काम पेंटर दिलीप भोरकडे यांनी केले . यामुळे या गावात या सर्व युवकांचे दिलीप भोरकडे , बाबुराव साळुंखे , संभाजी भोरकडे , रमेश घोडके ,पांडुरंग साळुंखे, सोनाली दिलीप भोरकडे , या कोरंनटाईन युवक  मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे, त्यामुळे गावातील सरपंच सौ भाग्यश्री मासाळ , ग्रामसेवक सोनवणे भाऊसो, तलाठी एकतपुरे भाऊसाहेब, पोलीस पाटील सोनवणे, आरोग्य सेविका बिराजदार मॅडम, त्यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे, याप्रसंगी गावातील करुणा गाव दक्षता समितीचे कार्यकर्ते, आमिर आतार , श्रीकांत सोमुत्ते, रमेश पुजारी, निसार आतार, व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संतोष जामदार, दिलीप भोरकडे , सिद्धू   येड्डे  , कोतवाल गुलाब सोनवणे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *