Headlines

आमच्यासाठी गाडी धावेल का ?

                                                   

 रस्ते आम्हीच बनवले
पण त्या रस्त्यावरून आमच्यासाठी गाडी नाही धावली. म्हणून तो कामावर बहिष्कार नाही टाकला
हे चित्र बार्शी  येथील पोस्ट ऑफिस समोरील सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आहे. लॉकडाउन मध्ये थोडी शिथिलता आली. आणि कामगार जो उपाशी होता तो तसाच पोटासाठी कामावर रुजू झाला. तोंडाला फडकं बांधलेलं.  दुपारच्या साडेबारा एक दरम्यान रखरखत्या उन्हात जीव गुदमरत होता ,त्यात पुन्हा शारीरिक अंतर आणि हे कामगार काम करत होते. उद्या पूर्ण लॉक डाऊन उठवल्यावर या रस्त्यावरून जाताना तुम्हा आम्हाला गाडी चालवताना तत्रास होऊ नये याची तो खबरदारी घेत तर नसेल?.  खर तर सगळीकडे भीतीच साम्राज्य पसरले असताना हे निडर जीवाची परवा न करता रस्त्याचं काम करायला उतरले. कारण त्यांच्या पोटात भुकेची आग होती. लेकरं उपाशी होती.
लाखो कामगार आप आपल्या गावी मिळेल त्या वाहनाने , मिळेल त्या रस्त्याने, कोणी गाडीवर, कोणी कंटेंनरमध्ये बसून, कोणी सायकलवरच हजारो किमो  गेला. त्यापेक्षा भयानक जे होत ते लेकरं बाळ महिला यांचा जीवघेणा चालत जाणारा प्रवास जो अजूनही चालू आहे. पाय फाटले, रस्त्यांनी चराचरा पोळले,  रक्तबंबाळ झाले.कधी कोलमडून पडले. तरी चालणं थांबवलं नाही. रस्त्यानं चालू देईना म्हणून रेल्वेच्या रुळावरून चालू लागले. चालता चालता थकली गेली आणि तिथेच झोपी गेली ती कायमची. सगळा देश हाळहळून गेला.
 आत्मनिर्भरतेच धडेे दिले गेले पण कामगारासाठी ठोस काही केलं नाही. उलट कामगार कायदेच बंद दाराआडून लॉक डाऊन ची संधी साधत गुंडाळायला लागलयं हे सरकार.
परदेशातील लोकांना सुखरूप आणलं परत पण माझ्याच देशातील ज्यांनी ही शहर उभा केली. रस्ते बांधले, विमानतळ उभारली, शहर सजवली त्या शहरातुन बाहेर पडताना हा कामगार बकाल झालेला.
तरी तो त्या शहरावर नाराज नाही झाला त्याच एवढंच म्हणन  आहे, आम्हाला आमच्या घरी जाऊद्या. नाही ऐकलं कोणी त्याच नियमांचं मोठी लठ्ठ लिस्ट त्यासमोर मांडली आहे. हजारो कामगार आजही घरी जाण्यासाठी दररोज या नियमांची पूर्तता करत आहे. ज्याचा नंबर लागला त्याला आनंद गगनात मावेना झाला. ज्याचा नाही लागला तो पुन्हा नव्याने कामाला लागतो हे दररोज चालूच आहे.
हा शहर सजवलेला कामगार परत जातो आहे तो पुन्हा येईल का या शहरात?? जिथे त्याच्या आठवणी जुडल्या आहेत. तो पुन्हा येईल का ही शहर सजवायला .?? तो पुन्हा येईल का हजारो किमो वरून त्याच लेकरं बाळ कुटुंब सोडून.?
या रस्त्याच काम करणाऱ्या कामगारां बघून हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.
                                दत्ता चव्हाण
      (लेखक डाव्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *