Headlines

कराड नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ  

[ad_1]

सातारा दि. 20 (जिमाका) :  जिल्हा वार्षिक योजनेमधून कराड नगर परिषदेला विविध विकास कामांसाठी 11.26 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज सहकार, पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक राजेंद्र यादव, सौरभ पाटील,  जयंत पाटील (काका), अनिता पवार, सुभाषराव पाटील यांच्यासह विविध प्रभागांचे नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत 7.10 कोटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा 2.80 कोटी व नागरी दलितेतर योजनेंतर्गत 1.36 कोटी असे एकूण 11.26 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानातून कराड शहर व वाढीव भागातील एकूण 115 कामे हाती घेण्यात येणार आहे. 115 कामांपैकी 6 कामांचा प्रतिनिधीत्व स्वरुपात भूमीपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, अनुदानातून हाती घेण्यात आलेली कामे ही संपूर्ण कराड शहर व वाढीव भाग परिसरातील असून यामध्ये रस्ते डांबरीकरण करणे, छोट्या रुंदीच्या रस्यांचे कॉक्रटीकरण करणे, गटर बाधणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या प्राथमिक सोई-सुविधांमध्ये भर पडणार आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *