Headlines

‘एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा…’, कुशल बद्रिकेचा चाहत्यांना सल्ला

[ad_1]

Kushal Badrike Relationship Advice : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. याच कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता कुशल बद्रिकेने त्याच्या चाहत्यांना नाती टिकवण्याबद्दल एक सल्ला दिला आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून तो विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे सर्व फोटो ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या सेटवरील आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्याने नाती टिकवण्याबद्दल एक सल्ला दिला आहे. 

कुशल बद्रिकेचा सल्ला

“कधी कधी आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहतं, पुढे निघून गेलेल्यांना हाक मारुन थांबवावसं वाटतं आणि मागे राहिलेल्यांसाठी इथे सावलीत थोडा वेळ थांबावसं वाटतं. पण हे फक्त आपल्यालाच वाटत असेल तर… ? “एखादं नातं तेंव्हाच टिकतं जेंव्हा त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांविषयी समान भावना असतात”, म्हणून आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येई पर्यंत आणि एखादा कुणीतरी सावलीत वाट बघताना दिसे पर्यंत”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. 

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. “मग तू थांब बघू जरा मी आलोच 4 april नंतर”, अशी कमेंट संतोष जुवेकरने केली आहे. त्यावर कुशलने मी थांबलोय संत्या… तू कधीही ये, I promise you अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने कुशलला चहा हवा येऊ द्या पुन्हा सुरु होणार का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर त्याने होईल, असे म्हणत कमेंट केली आहे. सध्या कुशलची ही पोस्ट चर्चेत आहे. 

आणखी वाचा : गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, करीना आणि करिश्मा कपूर यांनाही विशेष जबाबदारी!

दरम्यान कुशल बद्रिके हा सध्या सोनी टीव्ही वाहिनीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात झळकत आहे. या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारही दिसत आहेत.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमा कुरेशी करत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *