Headlines

zee 24 taas leaders : 12 मुलांचं सत्य अखेर उघड; माधुरी दीक्षित यांचा मोठा खुलासा

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री माधुरी दिक्षित निर्मीत ‘पंचक’ हा सिनेमा  लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या निमीत्ताने माधुरी यांनी नुकतीच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. नुकतीच ‘झी २४ तास’च्या  ‘लिडर्स’ या कार्यक्रमात  माधुरी दिक्षीत नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक निलेश खरे यांनी माधुरी यांना एक गंमतीशीर प्रश्न विचारला. हा प्रश्न माधुरी यांच्या मुलांविषयी होता. 

नुकतीच माधुरी आणि श्रीराम नेने यांनी ‘झी 24 तास’च्या ‘लीडर्स’ या कार्यक्रमात हजेरी लावली. माधुरी यांना प्रश्न विचारण्यात आला की, ”आम्ही असं ऐकलंय की, लग्न झाल्यानंतर तुम्हावा १२ मुलं असावी असं तुमचं स्वप्न होतं म्हणून?” यावंर उत्तर देत माधुरी म्हणाल्या की, ”हो खूप लहानपणी. मला खूप आवडतात लहान मुलं आणि म्हणूनच मला असं वाटयचं. thats was my dream but by the time but actully  happened दोन झाली आणि its was like ok. मस्त.” यानंतर यांना पुढे विचारण्यात आलं की, ‘कधी श्रीराम यांना हे सांगितलं होतं का? माझं असं स्वप्न आहे म्हणून.” यावर माधुरी म्हणाल्या, ”हो तो हे ऐकून घाबरला.” यानंतर नेने म्हणाले. ”आम्हा दोघांना मुलं पाहिजे होते पण, काय होतं, टाईम जातो आणि खूप बिझी होतो दोघंही. आम्हा दोघांकडेही फार वेळ नव्हता. मी हॉस्पिटलमध्ये भरपूर तास बिझी तिला तिच्या फिल्ममध्ये खूप तास काम करायला लागयचं. मुलांना बघायला पाहिजे ना. दोन मुलं म्हणजे खूप झालं. मेन ऑन मेन defaince होतो. त्याच्यावर गेलो तर defaince zone होतो. क्रिकेट टीम होते.  पुढे सगळं करायलाच कठिण.” असं यावेळी माधुरी आणि डॉ. नेने म्हणाले.

माधुरी दिक्षीत आणि श्रीराम नेने निर्मीत पंचक हा सिनेमा येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रीराम नेने व माधुरी दिक्षीत नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.  जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *