Headlines

Yuvraj Singh ला कोणामुळे नाही मिळालं कर्णधारपद? अखेर मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली

[ad_1]

मुंबई : 2007 सालचा टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वनडेच्या वर्ल्डकपमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे युवराज सिंग. युवराज सिंगचा खेळ पाहता एक वेळ अशी होती, ज्यावेळी टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून युवराजचं नाव घेतलं जात होतं. मात्र त्याला टीमच्या कर्णधारपदाची धुरा कधी मिळाली नाही. 

दरम्यान नुकतच युवराज सिंगने भारतीय टीममध्ये कर्णधार न मिळाल्याबाबत वक्तव्य केलं आहे. भारतीय क्रिकेट टीममधील बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना आपण कर्णधार व्हावं असं वाटत नसल्याचं, युवराजने सांगितलं आहे. 

युवराज सिंग म्हणाला, त्यावेळी मी भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार होतो. मात्र मला कर्णधारपद देण्यात आलं नाही. माझ्या जागी काही काळापूर्वी टीमशी संबंधित असलेल्या एमएस धोनीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. 

तुम्हाला सांगतो, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्रेग चॅपल 2005 ते 2007 पर्यंत भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांचा सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर या दोघांशी वाद झाला होता. 

दरम्यान सचिन ए बिलियन ड्रीम्समध्ये तेंडुलकरने चॅपेल टीमचं ज्या पद्धतीने नेतृत्व केलं त्यावरून ज्येष्ठ खेळाडूही असहमत होते. 

युवराज सिंगने पुढे सांगितलं की, “चॅपेल किंवा सचिन यापैकी एकाची निवड करायची होती. त्यावेळी कदाचित मी एकमेव असा खेळाडू होतो ज्याने सचिनची निवड केली होती आणि त्याला पाठिंबा दिला होता. जे बीसीसीआयच्या निवडक अधिकाऱ्यांना आवडलं नाही. त्यावेळी ते कोणालाही कर्णधार बनवतील, पण मला नाही, असं ही माझ्या कानावर आलं होतं. मी जे ऐकलं ते कितपत खरं आहे किंवा नाही हे मला माहीत नाही.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *