Headlines

yashomati thakur reaction on gulabrao patil statement on sushma andhare spb 94

[ad_1]

शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा रंगल्याने बघायला मिळते आहे. दरम्यान, काल सुषमा अंधारेंच्या आरोपांना उत्तरं गुलाबराव पाटील यांनी त्यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यानंतर सर्वच स्तरावरून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका सुरू आहे. काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही गुलाबराव पाटील यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – पुण्यात दोन दादांची वर्चस्वाची लढाई सुरू; अजितदादा आणि चंद्रकांतदादा आमने-सामने

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

जळगावमध्ये सुषमा अंधारे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत गुलाबराव पाटलांवर टीका केली होती. “गुलाबराव पाटील यांनी दबावामुळेच आपल्या सभेला परवानगी मिळाली नाही”, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला. “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर (चित्रपट) कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती” असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते.

हेही वाचा – गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; सुषमा अंधारेंचा भलत्याच शब्दांत केला उल्लेख, म्हणाले, “बाई आहे म्हणून…”

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. “सुषमा अंधारे या नेहमीच व्यापक दृष्टीकोन ठेऊन बोलत असतात. बाकी कोणाकडे किती नट्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या विषयावर न बोललं बरं. मात्र, एका स्रीचा मान-सन्मान आपण ठेवला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच “गुलाबराव पाटलांना मी चांगलं ओळखते. ते सद्सद्विवेक बुद्धी ठेऊन नेहमी बोलत असतात. मात्र, त्यांनी हे विधान कसं केलं, याचे कारण समजण्यापलीकडे आहे”, असेही त्या म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *