Headlines

‘यामुळे मला चित्रपटातून काढलं’… रणवीर सिंगचं मोठं वक्तव्य

[ad_1]

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ सीझन 7 चा प्रीमियर गुरुवारी पार पडला. होस्ट करण जोहरच्या सेलिब्रिटी चॅट शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट पाहुणे म्हणून आले होते.

रणवीर आणि आलियाने 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता दोघंही त्यांचा दुसरा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ वर काम करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर करत आहे. त्याचबरोबर, ‘कॉफी विथ करण सीझन 7’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये, रणवीर सिंगने अनौपचारिकपणे ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटातून वगळण्यात आल्याचा खुलासा केला.

हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. जो नंतर रणबीर कपूरला मिळाला होता. या चित्रपटात अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत होती.

या चित्रपटातून बाहेरचा मार्ग दाखवला 
रणवीर आणि आलियाने ‘कॉफी विथ करण’मध्ये कॉफी बिंगो नावाचा गेमही खेळला. या गेममध्ये रणवीरने सांगितलं की, त्याला एका भूमिकेसाठी नाकारण्यात आलं होतं. यावर करणने त्याला विचारलं की  तु  ‘बॉम्बे वेलवेट’चा संदर्भ देत आहेस का? त्यानंतर रणवीरने सांगितलं की, त्याला सिनेमात घेतलंच नाही

रणवीर पुढे म्हणाला- ‘खरंच मला अनौपचारिक पद्धतीने चित्रपटातून काढून टाकण्यात आलं, कारण त्यावेळी माझी स्टार व्हॅल्यू जास्त नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. करण जोहरने ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटातही काम केलं होतं. तसंच विकी कौशल देखील या सिनेमात दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.

रणवीर सिंग शेवटचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसला होता. तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय रणवीर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर आलिया अखेरची संजय लीला भन्साळीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसली होती. यावर्षी ती अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’मध्ये पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. सध्या आलिया तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चं शूटिंग करत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *