Headlines

‘या’ पाच चुका नव्या स्मार्टफोनला लवकर करतात खराब, जाणून घ्या टिप्स

[ad_1]

नवी दिल्लीः Smartphone Mistakes: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तो फोन लवकर खराब होत असेल तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कारण, अनेक जण स्मार्टफोनचा वापर करीत असताना चुका करीत असतात. स्मार्टफोनचा वापर कसा करावा, हेच अनेकांना माहिती नाही. त्यामुळे फोन लवकर खराब होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुका संबंधी माहिती देणार आहोत, या चुका तुम्ही टाळल्यास तुमचा फोन खराब होणार नाही. जाणून घ्या डिटेल्स.

१. काहीही डाउनलोड करू नका

स्मार्टफोनमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त अॅप्स डाउनलोड करू नका. कारण, याचा प्रोसेसरवर परिणाम होत असतो. त्यामुळे फोन स्लो होतो. तसेच नंतर मग बॅटरी हिटिंगची समस्या उद्भवते. ज्या अॅप्सची गरज आहे. तेच अॅप तुम्ही फोनमध्ये डाउनलोड करायला हवेत.

२. मोबाइलची स्क्रीन बंद ठेवा

जर तुम्ही तासनतास मोबाइलची स्क्रीन बंद ठेवत नसाल तर तुमच्या फोन खराब होण्यास वेळ लागणार नाही. सतत स्क्रीन सुरू ठेवल्याने याचा परिणाम मदर बोर्डवर होत असतो. त्यामुळे तुमचा फोन खराब होवू शकतो. किंवा कुठलाही पार्ट डॅमेज होवू शकतो. स्मार्टफोनला आराम देणे गरजेचे आहे.

३. स्मार्टफोनला स्वच्छ करताना काळजी घ्या

स्मार्टफोनला स्वच्छ करायचे म्हणून कुठल्याही कापडाचा वापर करू नका. यामुळे तुमच्या फोनला स्क्रॅश पडू शकतात. फोन डॅमेज होवू शकतो.

४. वॉटर बेस्ड किंवा क्लिनरचा वापर टाळा

फोनला स्वच्छ करताना कोणत्याही वॉटर बेस्ड किंवा क्लिनतरचा वापर करणे टाळा. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनल पार्ट्स खराब होवू शकतात. फोनला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खर्चही करावा लागू शकतो.

५. पोर्ट्सला व्यवस्थित हाताळा

स्मार्टफोनच्या पोर्ट्सला खूपच काळजीपूर्वक हाताळा. यात घाण साचणार नाही, याची काळजी घ्या. याला कोणत्याही प्रोफेशनलकडून स्वच्छ करून घ्यायला हवे.

वाचाः Xiaomi ने आणली ८६ इंचाची स्मार्ट टीव्ही, डिस्प्ले-साउंड जबरदस्त, किंमत ‘इतकी’

वाचाः Samsung Galaxy S22 Ultra च्या खरेदीवर फ्री मिळणार गॅलेक्सी वॉच ४, वॉचची किंमत ३०,००० रुपये

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *