Headlines

Women’s T20 WC 2023: आजपासून महिला विश्वचषक स्पर्धा, भारत-पाक सामना कधी आणि कुठे जाणून घ्या…

[ad_1]

Women’s T20 WC 2023: आजपासून महिलांच्या या टी-20 विश्वचषकाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेशी (SL vs SA) भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. तर  भारतीय संघ रविवारी (12 फेब्रुवारी) किताबाच्या मोहिमेला सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.  यादरम्यान भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) महिला संघांत हा सामना हाेणार आहे. भारताच्या युवा संघाने या ठिकाणी वर्ल्डकप जिंकला आहे.  

भारतीय महिला संघाने 2020 मध्ये सातव्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. मात्र या विश्वचषकात 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. येथे दोन गट तयार करण्यात आले असून, त्यात 5-5 संघ ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. गट टप्प्यात, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह एक-एक सामने खेळेल. दोन्ही गटातील अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 

भारतीय संघाचे सामने

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाचा (team India) पहिला सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजशी लढत होईल. तर 18 आणि 20 फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्याशी सामने होतील. टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू होतील. 

दहा संघ दोन गटांत

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या 10 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
गट-अ: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
गट-ब: भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज

पाहा संपूर्ण वेळापत्रक 

10 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (केपटाऊन, रात्री 10.30)
11 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (पार्ल, संध्याकाळी 6.30 वाजता)
11 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (पार्ल, रात्री 10.30)
12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
12 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (केपटाऊन, रात्री 10.30)
13 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध इंग्लंड (पार्ल, संध्याकाळी 6.30 वाजता)
13 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (पार्ल, रात्री 10.30)
14 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (गेकेबेरा, रात्री 10.30)
15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
15 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, रात्री 10.30)
16 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
17 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
17 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, रात्री 10.30)
18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
18 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गेकेबेरा, रात्री 10.30)
19 फेब्रुवारी : पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (पार्ल, संध्याकाळी 6.30)
19 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (पार्ल, रात्री 10.30)
20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
21 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
21 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (केपटाऊन, रात्री 10.30)
23 फेब्रुवारी: उपांत्य फेरी 1 (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
24 फेब्रुवारी: उपांत्य फेरी 2 (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
26 फेब्रुवारी: अंतिम (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)

सामना कुठे पाहणार? 

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामन्यांचे थेट प्रसारण ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्ने हॉटस्टार आणि स्टार स्पोर्टस् वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

भारत तीनवेळा सेमीफायनलमध्ये

भारताने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात टी-20 विश्वचषकांमध्ये तीन वेळा उपांत्य फेरीत आणि एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडिया 2009, 2010 आणि 2018 मध्ये सेमीफायनल खेळली आहे. त्याचवेळी 2020 विश्वचषकात अंतिम सामना खेळला होता. याशिवाय 2012, 2014 आणि 2016 मध्ये टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्येच पराभूत होऊन बाहेर पडावे लागले होते.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *