Headlines

महिलांच्या अंतर्वस्त्रावर Amitabh Bachchan यांनी केलेलं 13 वर्षं जुनं ट्वीट व्हायरल, नेटकरी म्हणाले ‘जयाजी तुम्हाला…’

[ad_1]

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचे लाखो चाहते आहेत. अमिताभ हे त्यांच्या वयातही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. बऱ्याच वेळा त्यांचे चर्चेत राहण्याचे कारण हे त्यांच्या पोस्ट असतात. दरम्यान, आता अमिताभ चर्चेत येण्याचं कारण त्यांची एक जूनी सोशल मीडिया पोस्ट आहे. 
 
आज वयाच्या 80 व्या वर्षी देखील अमिताभ ज्या प्रकारे फिट आहेत ती एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे गॅजेट्सचं त्यांना असलेलं नॉलेज या सगळ्या गोष्टी अनेकांना आश्चर्यात पाडण्यासारख्या आहेत. दरम्यान, अमिताभ यांचं 13 वर्षे जून एक ट्वीट आहे जे अनेकांच्या नक्कीच लक्षात असेल. त्यांनी हे ट्वीट 12 जून 2010 मध्ये केलं होतं. अमिताभ यांनी त्यांच्या या ट्वीटमध्ये स्त्रीयांच्या अंतर्वस्त्रावर कमेंट केली होती. त्याचं हे ट्वीट आता पुन्हा एकदा व्हायरल झालं असून अनेकांना सोशल मीडियावर प्रश्न पडला आहे की बिब बी सोशल मीडियावर असं कसं ट्वीट करू शकतात. अमिताभ या ट्वीटमध्ये म्हणाले होते की ‘इंग्रजी भाषेमध्ये ब्रा हा शब्द एकवचनी तर पॅण्टी हा शब्द अनेकवचनी का आहे?’ 

अमिताभ बच्चन यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की ‘जया जी तुम्हाला विचारत नाही हे सगळं.’ दुसरा नेटकरी म्हणाला,  ‘देशाला जाणून घ्यायचं आहे असं का?’ तर तिसरा नेटकरी म्हणाला होता की ‘अमितजी, ही कशी वागणूक आहे?’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्हाला हाच सगळ्यात महत्त्वाचा विषय वाटला का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुमच्या सारख्या माणसाला अशा प्रकारेचे प्रश्न विचारणं शोभत नाही, तुम्हाला यावर सगळ्यांची माफी मागायला हवी.’

हेही वाचा : एक ग्लास दूध आणि खजूर खाऊन रणदीप हुड्डानं कमी केलं 26 किलो वजन? खुलासा करत अभिनेता म्हणाला…

अमिताभ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ऊंचाई आणि गुडबाय या चित्रपटांमध्ये दिसले होते. आता त्यांच्याकडे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा  ‘गणपत’ हा चित्रपट आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबतचा ‘कल्‍क‍ि 2898 AD’ हा चित्रपट आहे. तर त्याशिवाय ‘द इंटर्न’ चा रिमेक देखील आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *