Headlines

महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक 

[ad_1]

मुंबई, दि. 28 : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पोषण ट्रॅकर ॲपमधील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, पेन्शन, पदोन्नती यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव विलास ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *