Headlines

‘तू कधी लग्न करणार?’ लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने केला खुलासा, म्हणाली ‘स्थळ, कपडे आणि…’

[ad_1]

Swanandi Berde On Marriage : गेल्या वर्षात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन, सुरुची आडारकर-पियुष रानडे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, वनिता खरात-सुमित लोंढे, संकेत पाठक-सुपर्णा श्याम, दत्तू मोरे-स्वाती घुनागे यांसह अनेक कलाकार हे 2023 वर्षात लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरेने लग्नगाठ बांधली. यामुळे सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी स्टार किड्सने लग्नाबद्दल भाष्य केले आहे. 

स्वानंदी बेर्डेने केले लग्नाबद्दल वक्तव्य

मराठी सिनेनाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. स्वानंदी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता स्वानंदीने तिच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

स्वानंदीच्या उत्तराने वेधलं लक्ष

स्वानंदीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनथिंग’ हे सेशन घेतले. यात तिला चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी एकाने स्वानंदीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. “मॅडम, तुम्ही कोणत्या वर्षी लग्नबंधनात अडकण्याचा विचार करत आहात?”, असा प्रश्न स्वानंदीला विचारण्यात आला. त्यावर स्वानंदीने फारच हटके उत्तर दिले. “स्थळ, कार्यक्रम, कपडे हे सर्व काही माझ्या डोक्यात ठरलेले आहे. फक्त आता…”, असे स्वानंदी बेर्डेने यावेळी म्हटले. तिच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

swanandi berde

आणखी वाचा : ‘हे फार धाडसाचे काम…’, शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया

आणखी वाचा : आदेश बांदेकरांची कार बोगद्यात अडकली, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले ‘ही वेळ…’

दरम्यान स्वानंदी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार किड्स आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची ती मुलगी आहे. स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून रंगमंचावर पदार्पण केलं. या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया बेर्डे या मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.   



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *