Headlines

Who gave Kolhapur administration the right to insult our God Nitesh Rane msr 87

[ad_1]

राज्या सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. करोनारूपी संकटामुले दोन वर्षे गणेशभक्तांना गणेशोत्सवासह अन्य उत्सव देखील साजरा करता आले नव्हते. मात्र आता निर्बंध हटल्याने गणेशभक्तांचा उत्साह कमालीचा वाढलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव देखील साजरा होत आहे. अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या, तीन दिवसांच्या आणि आता पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जनाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर, भाजपा आमदार नितेश राणेंनी कोल्हापूरमधील गणेश विसर्जनाच्या अनोख्या पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

यंदा कोल्हापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी एक अनोखी व्यवस्था केली आहे. शहरातील इराणी खणीजवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी एक यंत्र उभारण्यात आले आहे. या स्वयंचलीत यंत्राद्वारे गणेश मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यात येत आहे. राज्यात प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग होत असून, तब्बल ८३ लाख रुपये खर्चून ही यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या यंत्रणेवर भाजपा आमदार नितेश राणेंनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, याला विसर्जन म्हणतच नाही!, “कोल्हापूर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? ” असा सवाल नितेश राणेंनी ट्वीटद्वारे केला आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करावं, असं आवाहन प्रशासकांकडून करण्यात आलं आहे. नितेश राणे यांनी कोल्हापूरमधील गणेश मूर्ती विसर्जन व्यवस्थेचा व्हिडीओ ट्विटर आणि सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *