Headlines

सारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, ‘गेल्या 2 वर्षात…’

[ad_1]

Kartik Aaryan Open For Love : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैया 2’, ‘सत्यप्रेम की कथा’, शेहजादा, यांसारख्या चित्रपटामुळे चर्चेत आला. आता कार्तिक हा ‘भूल भूलैया 3’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यासोबतच तो ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातही झळकणार आहे. सध्या या दोन्हीही चित्रपटांचे शूटींग सुरु आहे. आता कार्तिक आर्यनने त्याच्या लव्ह लाईफबद्दल भाष्य केले आहे. 

‘आता मला प्रेमात पडायचेय’

कार्तिक आर्यनने नुकतंच अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर विथ नेहा’ या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वात हजेरी लावली. यावेळी नेहा धुपियाने कार्तिक आर्यनला डेटिंग आणि लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कार्तिकने “मला आता प्रेमात पडायचे आहे”, असे वक्तव्य केले. “मी गेल्या काही वर्षांपासून प्रेम, रिलेशनशिप यापासून दूर पळत आहे. कारण मला माझ्या करिअरवर आणि चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. पण आता मला प्रेमात पडायचे आहे. आता मी सध्या सिंगल आहे. पण मी माझे प्रेम शोधत असून मला रिलेशनमध्ये येण्याची प्रचंड इच्छा आहे”, असे कार्तिक आर्यन म्हणाला. 

“गेल्या दोन-अडीच वर्षांपासून माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त चित्रपट, त्याचे शूटींग, शूटींगच्या वेळा, फिटनेस याच गोष्टी सुरु आहेत. त्यामुळे मला इतर काही गोष्टी करण्याचा किंवा त्याबद्दल विचार करण्याचा वेळच मिळाला नाही. माझ्यासाठी या सर्व गोष्टी क्षणिक आहेत. मी एक रोबोटिक जीवनशैली जगत आहे. पण आता मी प्रेमासाठी माझा वेळ काढला आहे. त्यामुळे बघू कोणी मिळतं का? असे कार्तिकने म्हटले आहे. त्यासोबतच तो नेहाला तूच आता माझ्यासाठी कोणीतरी शोध”, असे सांगतानाही दिसत आहे.

लवकरच झळकणार ‘भूलभुलैया 3’ चित्रपटात

कार्तिक आर्यन हा लवकरच ‘भूलभुलैया 3’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटासोबतच तो ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 2024 याच वर्षात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने त्याचे वजन घटवले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल घोषणा केली जाणार आहे. 

दरम्यान कार्तिक आर्यन हा सारा अली खानसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण काही महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आता कार्तिकचे नाव अनन्या पांडे, पश्मीना रोशनसोबतच जोडण्यात आले होते. पण त्याने यातील कोणत्याही नात्यावर शिक्कामोर्तब केला नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *