Headlines

घटस्फोटानंतर जेव्हा अफेअरवर अफेअर करायला लागले नसीरुद्दीन शाह; रत्ना पाठकनं सोडलं मौन

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धक-धक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिचा पती आणि अभिनेता नसीरुद्दीन शाहसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. नसीरुद्दीन शाह यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला घटस्फोट आणि त्यांच्या इतर प्रकरणांवर रत्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नसीरुद्दीन आणि रत्ना हे त्यांच्या काळातील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. यावेळी रत्ना त्यांच्या आनंदी लग्नाबाबत आणि दीर्घ वैवाहिक जीवनातील महत्त्वाच्या पैलूंबद्दल खुलेपणाने बोलल्या आहेत.

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांची पहिली भेट 1975 मध्ये सत्यदेव दुबे यांच्या नाटकाच्या रिहर्सल दरम्यान झाली होती, त्यानंतर हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र या दोघांसाठी या पुढचा प्रवास सोपा नव्हता.  कारण अभिनेता त्यांची पहिली पत्नी परवीन मुरादपासून घटस्फोट घेत नव्हते. याशिवाय त्यांची मुलगी हिबा हिच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. रत्ना पाठक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तिला नसीरुद्दीन शाह यांचं आधीचं लग्न आणि नातेसंबंध याची पर्वा नव्हती. त्या म्हणाल्या, ‘आम्ही नाटक करत होतो. आम्हाला लगेजच समजलं की आम्हाला एकत्र राहायचं आहे. आम्ही वेडे होतो जे जास्त प्रश्न न करता, आम्ही विचार केला की, आम्हाला चांगलं वाटतंय तर चला ट्राय करुया आणि हे सक्सेस झालं.’

 रत्ना पाठक यांना नसीरुद्दीन शाह यांच्या भुतकाळाची चिंता नव्हती. कारण रत्ना यांचं त्यांच्यावर प्रेम होतं आणि तिला माहित होतं की अभिनेता त्याच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होत आहे. याआधी त्याचे  अनेक संबंध होते. रत्ना पुढे म्हणाल्या, ‘माझा त्याच्या भुतकाळाशी  काहीही संबंध नव्हता. त्याचे अनेक संबंध होते. हा सगळा भुतकाळा होता. जेव्हा मी त्याच्या आयुष्यात आले ते त्याच्या शेवटपर्यंत. 

रत्ना पाठक पुढे म्हणाल्या, त्यांचं लग्न असं नव्हतं की, जसं  आजपर्यंत त्यांनी पाहिलं होतं. कारण लग्नानंतर एका आठवड्यानंतर ती आणि नसीरुद्दीन हनीमूनला गेले आणि मध्येच नसीरुद्दीन पुन्हा परतले. रत्ना यांनी सांगितलं की नसीरुद्दीन यांनी ‘जाने भी दो यारो’चे शूटिंग सुरू केलं होतं आणि यादरम्यान तिने त्यांना अनेक दिवस पाहिलंही नव्हतं.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रत्ना पाठक यांच्या ‘धक धक’ मधील त्यांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत दिया मिर्झा, संजना सांघी आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेत्री तापसी पन्नूने निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *