Headlines

“…तेव्हा मोलकरीण माझ्याच घरात सेक्स करत होती”; कोंकणा सेन शर्माने सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1]

Konkona Sen Sharma On Lust Stories 2: अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) ‘लस्ट स्टोरी-2’च्या (Lust Stories 2) माध्यमातून दिग्दर्शिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आतापर्यंत आपल्या हटके भूमिकांमध्ये प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या कोंकणाने ‘लस्ट स्टोरी-2’मधील ‘द मीरर’ हा भाग दिग्दर्शित केला आहे. म्हणजेच कोंकणाच्या नजरेतून ‘द मीरर’ हा भाग मांडण्यात आला आहे. अनेकांना संपूर्ण चित्रपटातील ‘द मीरर’ची मांडणी फारच भावली आहे. कथा सांगण्याची कोंकणाची पद्धत फारच प्रभावी असल्याचं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे. तिलोत्तमा शोमीने मालकिणीची तर अमृता सुभाषने मोलकरणीची भूमिका साकारली आहे. मात्र ही कथा कशी सुचली यासंदर्भातील रंजक किस्सा नुकताच कोंकणाने एका मुलाखतीत सांगितला.

“माझी मोलकरीण घरात सेक्स करत होती”

कोंकणाने ‘द मीरर’च्या कथानकासंदर्भातील संपूर्ण प्रोसेस कशी झाली याबद्दलची माहिती ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. “काहीतरी अर्थपूर्ण आपण मांडवं यासंदर्भात माझे प्रयत्न सुरु होते आणि मी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करत होते. मला वासना यासंदर्भातील काहीतरी रंजक कथा यामधून मांडायची होती,” असं कोंकणाने सांगितलं. “मी या कथेकडे आईच्या दृष्टीकोनातून पाहत होते किंवा आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत आहे या दृष्टीकोनातूनही काही मांडता येतंय का याचा विचार करत होते. त्यावेळेसच एका डिनर पार्टीला मला माझी एक मैत्रीण भेटली आणि तिने मला तिच्या मोलकरणीसंदर्भात सांगितलं. मी जेव्हा घरात शिरले तेव्हा माझ्या घरी काम करणारी मोलकरीण माझ्याच घरात सेक्स करत होती, असं तिने मला सांगितलं. ते ऐकून मला हीच कथा घेता येईल असं वाटलं. कारण यात बरंच काही सांगण्यासारखं होतं तसेच कथेत बऱ्याच गोष्टी घडत असल्याचं जाणवलं,” असं कोंकणा म्हणाली.

मी तिचा सन्मान जपावा असा प्रयत्न केला

“लैंगिक उत्तेजना निर्माण करण्याच्या उद्देशाने मी कथा निवडली नव्हती. त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार ते करता येईल. कथेमधील सीमाच्या (अमृता सुभाषने साकारलेली मोलकरणी) पात्राला न्याय द्यावा आणि तिचा सन्मान जपावा असं मला वाटतं होतं. तिने जेव्हा मला परवानगी दिली तेव्हाच मी दिग्दर्शक म्हणून तिच्या रुमचा दरवाजा उघडून आत डोकावले आहे आणि ते ही संवाद साधण्यासाठी,” असं कोंकणाने कथनाकासंदर्भात माहिती देताना सांगितलं.

आपला संकुचित दृष्टीकोन

“मी मागील 20 वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी बराच संघर्ष केला. खास करुन कसं दिसावं, कसं यासारख्यात फीट बसावं यासाठी. एका अर्थाने याचा मला फायदा झाला कारण यामुळेच मला कळलं की इतरांच्या मान्यतेची मला गरज नाही. हवंहवंसं काय आहे याबद्दल आपला दृष्टीकोन फार संकुचित आहे,” असं कोंकणाने ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

तगडी स्टारकास्ट

2018 साली ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरी’ सिरीजचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला असून यात एकूण 4 भाग दाखवण्यात आले आहेत. अमित रविंद्रनाथ शर्मा, आर. बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि सुजॉय घोष यांनी हे भाग दिग्दर्शित केले आहेत. या सर्व भागांमध्ये तगडी स्टारकास्ट असून त्यामध्ये अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमूद मिश्रा, मृणाल ठाकूर, निना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोमी, विजय वर्मा यांचा समावेश आहे.

आशी दुवा आणि रॉनी स्कूवाला यांनी ‘लस्ट स्टोरी-2’ची निर्मिती केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *