Headlines

WhatsApp Trick : आता नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲपवर पाठवा कोणालाही मेसेज, वाचा सोपी ट्रिक

[ad_1]

नवी दिल्ली : WhatsApp Chat and Special tricks : व्हॉट्सॲप हे ॲप आपण सर्वाधिक वापरत असलो तरी त्यावर असे अनेक फीचर्स आहेत, जे आपल्याला अजून माहित नाहीत. व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही चॅटिंग करू शकता आणि कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग इत्यादी गोष्टी देखील करू शकता. पण काही खास फीचर्स असेही आहेत, जे आपण अद्याप वापरलेले नाहीत. तर आज आपण अशाच एका कामाच्या फीचरबद्दल बोलणार आहोत. तर साधारणपणे व्हॉट्सॲपवर एखाद्याला मेसेज पाठवायचा असेल तर आधी तुमचा नंबर सेव्ह करावा लागेल आणि नंतर त्याला मेसेज करावा लागेल. पण आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या एखा खास पद्धतीद्वारे तुम्ही एखाद्याचा नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲपवर त्याला थेट मेसेज पाठवू शकता. ही सोपी पद्धत नेमकी कशी आहे जाणून घेऊया…

नंबर सेव्ह न करता WhatsApp वर कोणालाही करा मेसेज
सर्वप्रथम तुमच्या फोनच्या ब्राउझरवर जा.
त्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला http://wa.me/91xxxxxxxxxx” टाकावे लागेल. जिथे 91 लिहिलेले असेल, त्यापुढे जो नंबर सेव्ह न करता तुम्हाला मेसेज करायचा आहे तो नंबर टाकावा लागेल. उदाहरणार्थ “https://wa. me /919888888888
यानंतर तुम्हाला थेट व्हॉट्सॲप स्क्रीनवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यानंतर तुम्हाला Continue Chat वर क्लिक करावे लागेल. हे चॅट विंडो उघडेल आणि तुम्ही चॅट करू शकाल.

नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज पाठवण्याचा हा आणखी एक मार्ग
सर्वप्रथम व्हॉट्सॲपवर जा.
यानंतर वरच्या उजव्या कोपर्यात जा आणि नंतर तुम्हाला स्वतःला मेसेज करायचा आहे. यासाठी तुम्हाला सर्च बॉक्समध्ये You टाइप करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला चॅटवर टॅप करावे लागेल. त्यानंतर चॅट बॉक्समध्ये जा आणि तुम्हाला मेसेज करायचा असलेला तो नंबर पेस्ट करा.
यानंतर, जेव्हा नंबरचा मेसेज सेंट होईल तेव्हा नंबर तो निळ्या रंगात दिसू लागेल.
मग तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीचा नंबर टॅप केला आहे त्याची चॅट विंडो उघडेल. त्यानंतर तुम्ही या नंबरवर सेव्ह न करता चॅट करू शकता.

वाचा : WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *