Headlines

WhatsApp चं नवीन फीचर, आता ग्रुपमध्ये टाईपिंग करण्यापेक्षा थेट व्हॉईस चॅट फीचर येणार

[ad_1]

नवी दिल्ली : WhatsApp Upcoming Feature : युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप कायमच नवनवीन फीचर घेऊन असते. आताही कंपनीने एक खास असं ग्रुप व्हॉईस चॅट फीचर आणलं आहे. याच्या मदतीने, वापरकर्त्यांना आता ग्रुपमध्ये सतत टाइप करण्याची आवश्यकता नाही. याने चॅटिंगचा अनुभव आणखी सुधारेल. व्हॉईस चॅटिंग म्हणजेच व्हाईस कॉल आताही फीचर आहे. पण आता येणारं हे WhatsApp ग्रुप व्हॉईस चॅटिंग फीचर यापेक्षा वेगळं असेल.

IANS च्या रिपोर्टनुसार, मेटा मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ग्रुप चॅटिंगसाठी एक नवीन व्हॉईस चॅट फीचर लाँच करणार आहे. हे फीचर सर्वप्रथम अँड्रॉइड यूजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल. यानंतर ते iOS वापरकर्त्यांसाठी आणले जाईल. हे फीचर व्हॉईस चॅटपेक्षा वेगळे असेल. हे ट्वीटर स्पेससारखे असेल, जिथे कोणताही वापरकर्ता ग्रुप व्हॉईस कॉलिंगमध्ये भाग घेऊ शकतो. पण ज्याप्रमाणे ट्वीटर स्पेसमध्ये कोणीही तुमच्यासोबत सामील होऊ शकत असेल तरी इथे मात्र फक्त ग्रुपमधील युजर्सनाच सामिल होण्याची अनुमती आहे.
कसं काम करेल हे फीचर?
या फीचरच्या मदतीने कोणताही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप युजर व्हॉइस ग्रुप कॉल करू शकेल. त्यावाच व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना कनेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. सोबतच हवं असल्यास युजर स्वतःला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलमध्ये ज्याप्रकारे कनेक्ट करू शकतील. तसंच हा कॉल लेफ्ट
करण्याचा पर्यायही असेल. या फीचर्समुळे हा महत्त्वाच्या चर्चांसाठी जसंकी ऑफिस मीटिंग यासाठी फायद्याचं ठरु शकतं. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅटचा पर्याय देखील उपलब्ध असेल.

वाचा : लॅपटॉपचा कीबोर्ड झाला खराब, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन घरच्या घरी करा रिपेअर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *