Headlines

“भारतात गोमांस…”; Beef खाण्याबाबत विवेक अग्निहोत्री यांनी दिलं स्पष्टीकरण

[ad_1]

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे विविध कारणांनी सातत्याने चर्चेत असतात. बॉयकॉट ट्रेण्डमुळे (boycott trend) गेले काही दिवस विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या नावाची चर्चा होती. बॉलिवूडमधील (bollywood) घराणेशाहीवर विवेक अग्निहोत्री सातत्याने टीका करत असतात. अशातच विवेक अग्निहोत्री यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये त्यांना बीफ (Beef) म्हणजे गोमांस आवडत असल्याचं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं होतं. या जुन्या व्हिडिओवरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते.

आता एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या व्हिडिओबाबत भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ एडिट केला असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. भारतात (India) गोमांस (Beef) म्हणजे म्हशीच मांस (buffalo) असते गायीचे नव्हे, असेही विवेक अग्निहोत्री म्हणाले. गोमांस खाणे आणि दारू पिणे का सुरू केले, याबाबतही विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केले. (Vivek Agnihotri explained on the viral video about beef)

ब्रह्मास्त्र रिलीज होण्याआधी रणबीर कपूरचा (ranbir kapoor) एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो बीफ (Beef) आवडत असल्याबद्दल बोलत होता. यावरुन त्याला ट्रोल (Troll) करण्यात आलं होतं. तेव्हा काही लोकांनी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा एक व्हिडिओ समोर आणला होता ज्यामध्ये ते गोमांस खाण्याबाबत बोलत होते.

त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या विषयावर भाष्य केले आहे. ब्रूट इंडियाशी संवाद साधताना अग्निहोत्री म्हणाले की, “लोक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतात. एक व्हिडिओ क्लिप होती. लोकांनी त्यातला आवाज एडिट केला होता. मी म्हणालो मी गोमांस खायचो. मी आता गोमांस खात नाही. जेव्हा लोकांनी यातून खात नाही एडिट केले तेव्हा असं वाटलं की मी गोमांस खायचो आणि आजही खातो. लोकांनी असे केले पण मला काही अडचण नाही.”

भारतात गोमांस मिळत नाही – विवेक अग्निहोत्री

“मी बीफ खायचो, यावरुन असं वाटतंय की मी रोज बीफ खात होतो. भारतात गोमांस मिळत नाही. ते म्हशीचे मांस असते. तरुण मुलं-मुली थोडे बंडखोर होतात. मी अत्यंत कडक शाकाहारी कुटुंबातून आलो आहे. माझ्या आईने कधी लसूण-कांदाही खाल्ला नाही. मी भोपळा खाणाऱ्या कुटुंबातून आलो आहे. तरुण असताना तु्म्हाला बंड करायची इच्छा होते. आधी तुम्ही सिगारेट ओढायला सुरुवात करता. मग दारु पिऊन बाहेर येतो. एक रेस्टॉरंट आहे जिथे सर्वजण जातात. त्यामुळे कदाचित मीही कधीतरी तिथे जाऊन हे सगळं खाल्लं असेल,” असेही विवेक अग्निहोत्री म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *