Headlines

विरुद्ध दिशेने कंटेनर चालवणं पाच जणांच्या जीवावर बेतलं; पुणे-नगर हायवेवर तीन चिमुरड्यांसह पाच जणांचा मृत्यू | Five members of a family died one injured in a road accident near Ranjangaon MIDC on Ahmednagar Pune Highway scsg 91

[ad_1]

पुणे-अहमदनगर मार्गावर रात्री दीड वाजता झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका कंटेनर आणि कारच्या अपघातामध्ये कारने प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील माहिती पोलीस महानिरिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवे हिप्नोसिस नेमके आहे तरी काय? त्यात काय घडतं?

विरुद्ध दिशेने प्रवास करत असणारा कंटेनर रस्त्यच्या मध्य भागी आला आणि त्याचवेळी समोरुन येणाऱ्या कारने या कंटेनरला धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये संजय म्हस्के (५३), राम म्हस्के (४५) या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या अपघातत सात वर्षांचा राजू म्हस्के, चार वर्षांची हर्षदा म्हस्के आणि १६ वर्षीय विशाल म्हस्केचाही दुर्दैवी अंत झाला आहे.

या अपघातामध्ये कारमधील साधना म्हस्के या गंभीर जखमी झाल्या आहेत. साधना यांचे पती राम यांच्यासहीत दोन्ही मुलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या कंटेनरचा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नक्की वाचा >> Vinayak Mete Death: घातपाताच्या दृष्टीकोनातून तपास सुरु, पोलिसांनी नोंदवला चालकाचा जबाब; मेटेंच्या पत्नीला वेगळाच संशय, म्हणाल्या, “ड्रायव्हर…”

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय म्हस्के हे नगरहून पुण्याकडे कारने येत होते. यावेळी एक कंटेनर विरुद्ध दिशेने व चुकीच्या बाजूने येत होता. कारेगावच्या हद्दीतील हॉटेल एस नाईनसमोर त्याने समोरुन कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात मोटारीमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी तातडीने रुग्णावाहिकेतून रुग्णालयात नेले. परंतु, त्यांच्यातील ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *