Headlines

VIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!

[ad_1]

Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : बॉलिवूड म्हटलं की अनेक गॉसिप आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कोणता सेलिब्रिटी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो, तर कधी कोणासोबत. पण या सगळ्याक किती सत्य आहे हे कोणालाही माहित नसतं. पण अनेकदा सोशल मीडियावर आपण पाहतो की पापाराझींमुळे त्यांचे सत्य समोर येते. पण आता चर्चा एका वेगळ्याच गोष्टीमुळे सुरु आहे. सध्या बॉलिवूड चर्चेत येण्याचं कारण या बॉलिवूडमधील तीन अव्वल दर्जाच्या अभिनेत्री आणि त्याचं अभिनेता रणबीर कपूरसोबत असलेलं खास कनेक्शन आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून हा फोटो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या फोटोत तीन दर्जेदार अभिनेत्री आहेत. करीना कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट. या तिन्ही अभिनेत्रींचा रणबीर कपूरसोबत खास संबंध आहे. ते कसं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर करीना कपूर ही रणबीरची बहीण आहे, कतरिना कैफ ही त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि आलिया ही त्याची पत्नी. त्यात या तिन्ही अभिनेत्री शेजारी – शेजारी बसल्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावर नेटकरी मजेशीर कमेंट करत आहे. 

या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘या तिघांचा रणबीर कपूरशी कसा ना कसा संबंध आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणाची बहीण, कोणाची एक्स, कोणाची पत्नी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘रणबीरची चुलत बहीण, एक्स आणि पत्नी.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘दीपिकाची चुगली करतील.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आम्हाला हे तिघं घेऊन जी ले जरा झालेला पाहायचा आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मला प्रियांका चोप्रा हवी जी ले जरामध्ये.’ 

हेही वाचा : एकमेकांच्या BF, GF वर कमेंट करायला लागले हृतिक-सुझैन! यूजर म्हणाले- ‘वाह भाभीजी वाह!’

दरम्यान, या तिघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर करीना कपूर खान सध्या तिच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जाने जा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जयदीप अल्हावत आणि विजय वर्मा हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. याच चित्रपटातून करीनानं ओटीटीवर पदार्पण केलं आहे. कतरिना विषयी बोलायचे झाले तर ती लवकर ‘टायगर 3’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. तर आलिया भट्ट ही लवकरच ‘जिगरा’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *