Headlines

विना इंजेक्शन मिळेल नवीन कोविड-१९ बूस्टर लस, अशी बुक करा, पाहा डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्लीः कोविड १९ चा धोका अजून टळला नाही. नवीन वर्षा सोबत याचे नवीन व्हेरियंट सुद्धा येत असल्याची चर्चा आहे. शेजारी देश चीनमध्ये सध्या भयानक परिस्थिती असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. भारतात सुद्धा आधीच्या तुलनेत रुग्ण वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. देशातील नागरिकांना बूस्टर डोस देण्याची संधी दिली जात आहे. यावेळी इंजेक्शनने लस नव्हे तर नाकात ड्रॉप टाकून लस दिली जाणार असल्याची चर्चा होत आहे. iNCOVACC फक्त भारतात नव्हे तर जगभरात नाकाद्वारे दिली जाणारी लस आहे.

१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. ही लस सोपी आणि सुरक्षित आहे. iNCOVACC लसीला सर्व नागरिकांसाठी खासगी लस सेंटरवर उपलब्ध केले जाणार आहे. परंतु याची लस घेण्यासाठी Covaxin आणि Covishield प्रमाणे स्लॉट बुक करावे लागणार आहे.

वाचाः करोनाची भीती वाढली, या ५ गॅझेट्सची पुन्हा आठवण झाली, आता स्वस्तात खरेदीची संधी

बूस्टर डोससाठी ऑनलाइन बुक करावा लागेल स्लॉट
नवीन नाकाद्वारे दिली जाणारी लसचा स्लॉट बुक करण्याची पद्धत आधीच्या प्रमाणे आहे. सर्वात आधी तुम्हाला CoWIN website किंवा app वर जावे लागेल. या ठिकाणी स्लॉट बुक करण्याचा ऑप्शन दिला जाईल. बुक करण्यात आलेल्या स्लॉट नुसार, सेंटरवर जावून तुम्हाला ही लस घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. नागरिकांना त्यांच्या मोबाइलच्या मदतीने लॉगिन किंवा रजिस्टर करण्याचा ऑप्शन दिला जात आहे.

वाचाः Vi ने आणला स्वस्त प्लान, Jio आणि Airtel चे टेन्शन वाढले, पाहा किंमत-बेनिफिट्स

या टिप्स फॉलो करून बुक करा स्लॉट
सर्वात आधी CoWIN official website cowin.gov.in वर जा.
जर तुम्ही आधी लस घेतली असेल तर त्याच नंबरवरून लॉग इन करा. असे न झाल्यास मोबाइल नंबर एन्टर करू शकता.
पोर्टलमधून लॉगइन केल्यानंतर तुम्हाला शेड्यूल्ड ऑप्शन शोधावा लागेल. पिन कोड किंवा जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल. नंतर जवळच्या लस सेंटरची माहिती द्यावी लागेल.
आपल्या जवळच्या लस सेंटरची निवड केल्यानंतर उपलब्ध स्लॉट पैकी एक निवड करावी लागेल.
अखेरमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट कन्फर्म करावे लागेल.

वाचाः Year Ender 2022: यावर्षात Google Hangout सह हे ५ टेक प्रोडक्ट झाले बंद, पाहा टॉप-5 लिस्ट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *