Headlines

David Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक

[ad_1]

David Warner Double Century : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज बॅट्समन आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ही डबल सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. त्यामुळे ही सेंच्यरी त्याच्यासाठी खुप खास असणार आहे.दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात वॉर्नरने ही कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

डबल सेंच्यूरी ठोकून रीटायर्ड हर्ट

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने (David Warner) तुफानी खेळी केली आहे. डेव्हिड वॉर्नरने पहिल्या डावात आधी शतक ठोकले त्यानंतर त्याने मैदानात जम बसवून डबल सेंच्यूरी ठोकली. डेव्हिड वॉर्नर आपल्या कसोटी कारकिर्दीत हा 100 वा कसोटी सामना खेळत आहे, ज्यात त्याने खेळताना 254 बॉलमध्ये 200 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरनेही आपल्या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार मारले. ही डबल सेंच्यूरी (David Warner Double Century) ठोकल्यानंतर त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो रीटायर्ड हर्ट झाला आहे. 

100 व्या कसोटीत ठोकलं शतक

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकले आहे. वॉर्नरने (David Warner Double Century)  त्याच्या 100 व्या कसोटीत शतक ठोकले आहे. अशी कामगिरी करणारा तो 10वा फलंदाज ठरला आहे. याआधी अनेक दिग्गज खेळाडू  अशी कामगिरी केली होती.  

‘या’ खेळाडूंची वॉर्नरपूर्वी 100व्या कसोटीत सेंच्यूरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 73 खेळाडूंनी किमान 100 कसोटी सामने खेळले आहेत. यामधील फक्त 10 खेळाडूंनी त्यांच्या 100 व्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.इंग्लंडचा कॉलिन काउड्री हा 100व्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पहिला खेळाडू होता. त्यांच्यानंतर पाकिस्तानच्या जावेद मियांदादने ही कामगिरी केली.मियांदादनेही आपल्या पहिल्या कसोटीत शतक झळकावले आणि पहिल्या आणि 100व्या कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.

वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजनेही ही कामगिरी केली. ग्रीनिजने आपल्या 100व्या वनडेतही शतक झळकावले. 100व्या एकदिवसीय आणि 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू होता. आता डेव्हिड वॉर्नरनेही (David Warner)  ही कामगिरी केली आहे. वॉर्नरने 2017 मध्ये भारताविरुद्धच्या 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते. इंग्लंडचा जो रूट हा 100 व्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आपल्या 100 व्या कसोटीत 218 धावा केल्या. आता डेव्हिड वॉर्नरनेही आपल्या 100व्या कसोटीत शतक झळकावले आहे. 

शतकाचा दुष्काळ संपवला 

डेव्हिड वॉर्नरने (David Warner Double Century) यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये आपले शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर आता 2022 मध्ये त्याने 200 धावांची स्फोटक खेळी खेळून आपल्या 3 वर्षांच्या शतकांचा दुष्काळ संपवला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत होता आणि त्याला संघातून वगळल्याची चर्चा होती. मात्र आता त्याने डबल सेंच्यूरी ठोकून सर्वांची तोंड बंद केली आहेत. 

8 हजार धावा पुर्ण 

डेव्हिड वॉर्नरने (David Warner Double Century) मेलबर्नच्या कठीण खेळपट्टीवर खुप चांगली फलंदाजी केली आहे. वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 8000 धावाही पूर्ण केल्या आहेत. आपल्या 100व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याच वेळी, जगात आणखी एक फलंदाज आहे, ज्याच्या आधी रूटने ही कामगिरी केली होती.

सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

डेव्हिड वॉर्नरने (David Warner Double Century)  क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉर्नरने सलामीला उतरून 45 शतक ठोकले आहे. यामध्ये त्याने 20 शतक वनडे सामन्यात ठोकली आहेत, तर 25 शतक टेस्टमध्ये झळकावली आहेत. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला उतरून 45 शतके झळकावली आहेत. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तर वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलने 42 शतक ठोकली आहेत. 

दरम्यान बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय यशस्वी ठरला आणि त्यांनी 189 धावांवर साऊथ आफ्रिकेला ऑल आऊट केले. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. कॅमरून ग्रीनने 27 धावा देत 5 विकेट काढली. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 351 धावा केल्या आहेत. यामध्ये डेविड वॉर्नरच्या (David Warner) 200 धावा आहेत. 200 धावा करून डेविड वॉर्नर रिटायर्ड झाला आहे. सध्या त्याच्या डबल सेंच्यूरीची चर्चा आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *