Headlines

Vijaya Ekadashi 2023 : ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ, वियजा एकादशी येईल मोठं यश

[ad_1]

Vijaya Ekadashi 2023 rashifal 16 February 2023 Thursday in marathi : आज विजया एकादशी…हा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भगवान श्रीरामांनी लंकेवर चढण्यापूर्वी विजया एकादशीचे व्रतही पाळले. आजच्या दिवशी विजया एकादशीचं व्रत केल्यास शत्रूंवर विजय प्राप्त होईल आणि जीवनात अपार सुख -समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. अशा या शुभ दिवशी काही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अपार यश आणि प्रगती घेऊन आलं आहे. (Vijaya Ekadashi 2023 rashifal 16 February 2023 Thursday All Zodiac Signs Aries Taurus Cancer Libra Capricorn in marathi )

‘या’ आहे भाग्यशाली राशी 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांचे स्वप्न पूर्ण होण्याची ही वेळ आहे. आज तुम्हाला अनेक आनंदायी बातम्या मिळणार आहे. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहिल. पण अतिउत्साह गोष्टी बिघडतात म्हणून जरा काळजी घ्या. कुटुंबासाठीही वेळ काढा. 

वृषभ (Taurus)

सट्टेबाजी आणि शेअर मार्केट यासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीतून आज तुमची चांगली कमाई होऊ शकते. जीवनसाथीचं सहकार्य मिळेल. लोक तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतील. आजचा दिवस करिअरसाठी चांगला आहे. नवीन डील मिळू शकते.

कर्क (Cancer)

आजचा दिवस बाहेर जाण्याचा आणि जीवनाचा शोध घेण्याचा आहे. घर-ऑफिसबाहेरचे जग पहा आणि त्यातून शिका. वैवाहिक सुख मिळेल. कामासाठी चांगला काळ.

तूळ (Libra)

आजचा दिवस तुमचा आहे. तुमचं समाजात आदर वाढले. राजकीय कार्यात यश मिळेल. सुखद प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. करिअरसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज मेहनत जास्त असेल पण यशही मिळेल. 

मकर (Capricorn)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाईल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांनाही फायदा होईल. मात्र, तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. बहुराष्ट्रीय कंपनीकडून ऑफर मिळेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *