Headlines

VIDEO : रोज आपका निकलता है, आज मेरा…; भर रस्त्यात जान्हवीनं असं म्हटलं आणि वळल्या नजरा

[ad_1]

Janhvi Kapoor Troll : काल संपूर्ण बॉलिवूड जणू एका ठिकाणी आलं होतं. बॉलिवूडचे सगळेच कलाकार हे हटके आउटफिट घालून आपल्याला जीओ वर्ल्ड प्लाझाच्या खास ओपनिंग कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात आपल्याला अभिनेत्री स्टायलिश लूकमध्ये दिसल्या. त्या सगळ्यांच्या लूक्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या सगळ्यात अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे.

जान्हवीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडीओत जान्हवीनं सिल्वर शिमरी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. व्हिजीओत जान्हवी बिल्डिंगमध्ये जाताना दिसत आहे. तर या दरम्यानच तिच्या पायातून चप्पल निघते. त्यावर जान्हवी पापाराझींशी बोलताना दिसते की, रोज तुमची निघते, आज माझी निघाली. तिचा हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की ‘चालायला होत नाही, किती फनी ड्रेस आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही हॉलोविन साजरा करते का?’ 

जान्हवीचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवीची एक फनी साइड आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत ती गाडीतून उतरताना दिसले. त्यावेळी तिनं हेवी वर्क असलेला स्कर्ट आणि कॉप टॉप परिधान केलं आहे. तर या ड्रेसमुळे जान्हवी ही अनकंफर्टेबल दिसत आहे.  ती तिचा ड्रेस ठिक करताना दिसली. पुढे जात असताना एका पापाराझीच्या हातात जान्हवीला जेवण दिसलं आणि ती लगेच त्याला म्हणाली की हे ‘खाना कहॉं सेे है’ (जेवण कुठून आहे.) तर जान्हवीच्या या व्हिडीओवर देखील अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘बिचारीला किती भूक लागली आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘असं वाटतंय तिच्या ड्रेसला मागून प्लास्टिक चिपकलं आहे.’ 

हेही वाचा : VIRAL VIDEO : ‘जस्ट लूकिंग लाइक ए वाव…’ रणवीर सिंगनं नीता यांच्यावर कमेंट करताच मुकेश अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन

दरम्यान, या कार्यक्रमात रणवीर सिंग, कतरिना कैफ, सलमान खान, करीना कपूर , दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट प्रमाणे अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. रणवीर सिंग, सोनम कपूर, सारा अली खान, रितेश – जिनिलिया, सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी आणि शहनाज गिल रॅम्प वॉक करताना दिसले.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *