Headlines

VIDEO: लय Attitude! शाहरूख खाननं रागाच्या भरात फॅनला दिला धक्का, ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1]

Shahrukh Khan Showed Attitude: सेलिब्रेटींच्या अहंकाराबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्यातून एखादा सेलिब्रेटी हा अतिउच्च पदावर असेल आणि त्याची लोकप्रियता ही जगाच्या कोनाकोपऱ्यात असेल तर पाहायलाच नको. सध्या असंच काहीस शाहरूख खानसोबत घडलं आहे. आपल्या सेलिब्रेटी असणाचा माज अनेकदा शाहरूख खाननं (Shahrukh Khan Viral Video) दाखवला आहे परंतु आता पुन्हा एकदा त्यानं याची पुनरावृत्ती केल्याचे दिसून आले आहे.

शाहरूख खान गेली 30 वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे, टेलिव्हिजनपासून सुरूवात करत हळूहळू चित्रपटांमध्ये नाव कमावू लागलेला हा अभिनेता आता जगाचा सुपरस्टार झाला आहे. 2 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी ‘मन्नत’वर हजारो चाहत्यांची रांग लागलेली असते. शाहरूख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात. 

शून्यातून गरीबीतून वर आलेला शाहरूख खान आपलं मूळ विसरला नाही असं पाहताच पापराझींनी (Shahrukh Khan Pushes Fan) शाहरूख खानचा खरा चेहरा समोर आणल्याचे दिसून येत आहे. 2021 साली आपला मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज केसमुळे शाहरूख खान बराच चर्चेत आला होता. आता यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे शाहरूख खानची बरीच चर्चा झाली होती. त्याच्या या चित्रपटानं अख्ख्या जगात विक्रमी रेकॉर्ड केला आहे. परंतु कुठेतरी प्रसिद्धी आणि यश डोक्यात जाते असं म्हणतात ते काही खोटं नाही असंच शाहरूख खानच्या या नुकतेच केलेल्या कृत्यावरून दिसून येते आहे. (viral video shahurukh khan shows attitude pushes a fan who tries to click a selfie with him at mumbai airport)

हेही वाचा – Anupam Kher यांचा आमिर खानला टोमणा; म्हणाले, ”…तर प्रेक्षक अजून सूडाने चित्रपट पाहतील”

सध्या शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एअरपोर्टवर (Shah Rukh Khan at Airport) शाहरूख आपल्या गाडीच्या दिशेनं जातो परंतु त्याचवेळी त्याचे फॅन्स हे त्याच्याभोवती गराडा घालतात. तेवढ्यात एक उतावळा फॅन त्याचा सेल्फी घेण्यासाठी त्याच्या पुढ्यात येतो आणि सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतो तोच शाहरूख त्याला रागानं जोरात धक्का मारतो आणि त्या फॅनचा चक्क मोबाईलच खाली पडतो. शाहरूख अशा भावात चालतो की जसं काही झालंच नाही. शाहरूखच्या भोवती बॉडीगार्ड्स असतात. हे सर्व दृश्य पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

या व्हिडीखाली ट्रोलर्सनी शाहरूख खानला (Shahrukh Khan Trolled) सपाटून ट्रोल केलं आहे. अनेकांनी शाहरूख खानवर नाराजी व्यक्त केली असून त्याच्यावर सडकून टीका केली आहे. एका युझरनं लिहिलंय की, ”हे सेलिब्रेटी एक गोष्ट विसरतात की यांना नक्की सेलिब्रेटी कुणी केलं ते”. तर एकानं लिहिलंय की, ”पठाण चित्रपट चालला म्हणून काय डोक्यात हवा गेलीये का?” तर अजून एकानं म्हटलंय की, ”या लोकांना फॅन्स तेव्हाच आठवतात जेव्हा यांचा कुठलाही चित्रपट येणार असतो”.

तर काही ट्रोलर्सनी त्याची बाजूही घेतली आहे. एकानं म्हटलंय की, ”शाहरूख खान हा फक्त त्या फॅनकडे हात दाखवत होता”. तेव्हा आता नक्की शाहरूख खान कोणत्या मन:स्थितीत होता आणि त्यानं असं का केलं हा प्रश्न कायम राहतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *