Headlines

VIDEO: पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद आहेत का? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, “गृह खाते…” | Shivsena MP Prataprao Jadhav comment on differences between Eknath Shinde and Devendra Fadnavis on IPS transfer

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मतभेद आहेत आणि त्यामुळे सध्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबल्या आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना बुधवारी (१९ ऑक्टोबर) बुलडाण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रतापराव जाधव म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून कोणतेही मतभेद नाहीत. दोघांची ही जोडी अतिशय एकविचाराची आहे. ते एक विचारांचे असल्यामुळेच राज्यामध्ये एवढे मोठे सत्तांतर झाले. त्यांचा एकमेकांवर विश्वास असल्याने आणि एकमेकांबद्दल चांगलं मत असल्यामुळेच महाराष्ट्रात ही क्रांती झाली.”

“मी काही गृहमंत्री नाही”

यावर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधीपर्यंत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, “मी काही गृहमंत्री नाही त्यामुळे मी त्यावर अधिकाराने सांगू शकणार नाही. मात्र, त्या बदल्या होणारच आहेत. मधल्या काळात सरकार बदललं, मग नवं सरकार स्थापन झालं, मग खातेवाटप झालं. आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे.”

हेही वाचा : “तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना…”, विनायक राऊतांचा पोलिसांवर गंभीर आरोप

“बदल्यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच”

“गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे बदल्यांचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. त्या मुख्यमंत्री शिंदेंना काही वाटलं तर ते त्यांना सांगतील. शेवटी आयएएस आणि आयपीएस लोकांच्या फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांकडेही जातात,” असंही प्रतापराव जाधव यांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *