Headlines

Video : “परिणीती भाभी जिंदाबाद”! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

[ad_1]

IPL 2023 : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) व आम आदमी पार्टीचे (AAP) नेते राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सुरुवातीला आपचे खासदार राघव चड्ढा यांनी याबाबत लग्नाच्या चर्चेबाबत नकार दिला होता. मात्र आता दिल्लीत दोघांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे बुधवारी राघव चड्ढांसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा आयपीएलचा (IPL) सामना पाहायला पोहोचल्यामुळे या चर्चांना आता विराम मिळाला आहे.

परिणीती भाभी जिंदाबाद

बुधवारी संध्याकाळी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी मोहालीत पोहोचले होते. यावेळी स्टेडिअममधील दोघांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी यावेळी परिणीती भाभी जिंदाबाद म्हणत अभिनेत्रीचं अनोखे स्वागत केले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोहालीच्या स्टेडियममध्ये परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी दिलेल्या घोषणा ऐकून अभिनेत्रीला धक्काच बसला.

यावेळी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा ‘परिणिती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा ऐकून आपले हसू आवरू शकले नाहीत. घोषणा ऐकून तर परिणीतीने डोक्यावरच हात मारला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ये पब्लिक है भाई सब जानती है, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर देण्यात येत आहेत.

परिणीती चोप्रा राघव चड्ढांसोबत लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. दोघेही लवकरच लग्न करू शकतात. लग्नाच्या प्रश्नावर परिणीती चोप्राने अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. मात्र असे असले तरी आयपीएल सामन्यातील दोघांचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे. तसेच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 13 मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आयपीएल 2023 च्या 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स ने पंजाब किंग्ज (PBKS) चा 6 गडी राखून पराभव केला. मोहालीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने हे लक्ष्य 18.5 षटकांतच पूर्ण केले. या विजयासह मुंबईने पंजाबकडून वानखेडेवर स्टेडिअमवर झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी अर्धशतकी खेळी खेळत मुंबईच्या संघाला यंदाच्या मोसमात पाचवा विजय मिळवून दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *