Headlines

VIDEO: या अभिनेत्रीने अचानक बाथरुममध्ये असं काही केलं, तिच्या बॉयफ्रेंडने कटाक्ष टाकताच…

[ad_1]

मुंबई : Karan Tejasswi Video: तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा नवीन व्हिडिओ (Karan Kundra Tejasswi Prakash Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण आणि तेजस्वी बाथरुममध्ये मज्जामस्ती करताना दिसत आहे. मात्र, बॉयडफ्रेंडने एक कटाक्ष टाकताच तेजस्वी प्रकाश हिचा कंट्रोल सुटला. त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने तिला संभाळले.

टेलिव्हिजन स्टार जोडपे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश त्यांच्या आकर्षक केमिस्ट्रीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. सोशल मीडियावर दररोज दोघांचे एकापेक्षा एक उत्तम फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. ते खूप वेगाने व्हायरल होत आहेत. पुन्हा एकदा तेजस्वी आणि करणचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की चाहते तो पुन्हा पुन्हा प्ले करत आहेत आणि आपले हसू आवरु शकत नाहीत.

करण-तेजस्वीचा नवा व्हिडिओ

समोर आलेल्या व्हिडिओबद्दल बोलताना, करण कुंद्रा आणि तेजस्वी पार्टीसाठी तयार होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, तयार झाल्यानंतर, तेजस्वी बाथरुममध्ये स्वतःचा एक क्यूट डान्स व्हिडिओ बनवू लागते. त्याचवेळी व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर करण कुंद्रा तिचा मेकअप करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत करणची नजर तेजस्वीवर पडताच तिची प्रतिक्रिया आणि  एक्सप्रेशन खूपच मजेदार आहे. नेटिझन्स तेजस्वीच्या बबली स्टाईल आणि करणच्या या प्रतिक्रियेबद्दल खूप चर्चा करत आहेत.

करण तेजस्वीची बाथरुममधील मजा

शेवट पर्यत हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करण जेव्हा ड्रिंक घेऊन बाथरुममधून बाहेर पडतो तेव्हा तेजस्वीने त्याला अतिशय क्यूट पद्धतीने मिठी मारली होती. करण आणि तेजस्वीची ही बाथरुम मस्ती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि सोशल मीडिया यूजर्स या जोडप्याच्या व्हिडिओवर प्रेम व्यक्त करत आहेत.

करण-तेजस्वीचा लूक

करण आणि तेजस्वीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी अभिनेत्री सोनेरी रंगाच्या चमकदार बॉडी फिट गाऊनमध्ये चमकताना दिसत आहे. तेजस्वीचा हा गाऊन मागून खोल गळ्याचा आहे, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्या पाठीवर खिळल्या आहेत. बोल्ड मेकअप आणि सैल केसांनी अभिनेत्रीने तिचा लूक उठून दिसत आहे. त्याचवेळी करण फॉर्मल लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे.

करण आणि तेजस्वीचा असा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु दररोज या स्टार कपलचे एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. करणसोबतच चाहतेही तेजस्वीच्या क्यूटनेसचे खूप वेडे आहेत. आता या जोडप्याच्या लग्नाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *