Headlines

VIDEO: “माझा आणि उदयनराजेंचा चित्रपटाला पाठिंबा असं खोटं दाखवलं, आता त्यांच्यावर…”, संभाजीराजेंचा गंभीर इशारा | Serious allegations of fake information by Sambhajiraje Chhatrapati on Film producer

[ad_1]

माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांवर गंभीर आक्षेप घेतले. यावेळी संभाजीराजेंनी चित्रपट निर्मात्यांवर “संभाजीराजे आणि उदयनराजेंचा पाठिंबा आहे,” असं खोट दाखवल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही नमूद केलं. ते रविवारी (६ नोव्हेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, “चित्रपट निर्मात्यांनी संभाजीराजे आणि उदयनराजेंचा याला पाठिंबा आहे, सहकार्य आहे, असं खोटं दाखवलं आहे. हर हर महादेवसह या चित्रपटांवर तातडीने कायदेशीर कारवाई करणार आहे.”

“हे खपवून घेणार नाही, वेळ पडली तर गाठ माझ्याशी”

“यांनी मध्येच मराठे आणि मराठी असं काहीतरी सुरू केलं आहे. पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण आहोत. सर्व अठरा पगडजात बारा बलुतेदार म्हणजेच मराठे आहेत. हे मराठे आणि मराठी कोठून आलं? मराठा ही काही जात नव्हती. हे यापुढे चालणार नाही आणि चालू देणार नाही. हे खपवून घेणार नाही, वेळ पडली तर गाठ माझ्याशी आहे,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.

“कोणी आडवं आलं तर पुढचं पुढं बघू”

“कोणी आडवं आलं तर पुढचं पुढं बघू. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला, मोडतोड केली तर संभाजी छत्रपती खपवून घेणार नाही,” असा इशाराही संभाजीराजे छत्रपतींनी दिला.

व्हिडीओ पाहा :

चित्रपटाला राज ठाकरेंचा व्हॉईस ओव्हर, संभाजीराजे म्हणाले…

चित्रपटाला राज ठाकरेंचा व्हॉईस ओव्हर आहे याबाबत विचारलं असता संभाजीराजे म्हणाले, “पत्रकारांनी मला माझ्याविषयीचे प्रश्न विचारावेत. मी त्यांची उत्तरं द्यायची का? मी त्यांची उत्तरं देणार नाही. मला माझ्याविषयी विचारा.”

हेही वाचा : राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंचा विरोध, म्हणाले, “त्यांना माझी…”

“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना इथं बोलवू आणि…”

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्या चित्रपटाच्या लाँचिंगच्या वेळी स्टेजवर होते. यावर विचारलं असता संभाजीराजे म्हणाले, “मग आपण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना इथं बोलवू आणि एकत्रित पत्रकार परिषद घेऊ. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार नाही. त्याची काहीही गरज नाही. त्यांच्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे. त्यांनी तिथं इतिहासाची समिती नेमावी.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *