Headlines

Video : मैदानावर असं काय घडलं की मारामारीच्या भाषेवर उतरला Rishabh Pant?

[ad_1]

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने एजबॅस्टनमधील सामना 49 रन्सने जिंकला. अशा प्रकारे, त्यांनी तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलीये. 

या सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ओपनिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या पंतने 15 चेंडूत 26 रन्स केल्या. दरम्यान या इनिंगमध्ये एक मजेदार घटनाही घडली, जी कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी पंतने इंग्लंडच्या फिल्डर्सना टक्कर मारण्याची गोष्ट केली होती. 

रोहित शर्माचंही गमतीशीर उत्तर

ही घटना टीम इंडियाच्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर घडली. डेव्हिड बिलीच्या बॉलवर पंतने मिड-विकेटच्या दिशेने हलका शॉट खेळला. यानंतर पंत आणि रोहित एका रनसाठी धावले. यावेली तर बॉल फिल्डरकडे होता. दोघांनीही हा रिस्की रन वेगाने पूर्ण केला. यादरम्यान डेव्हिड विली बॉल उचलण्यासाठी धावला आणि पंतच्या वाटेत आला.

यावेळी रन पूर्ण झाल्यावर पंत म्हणाला, ‘हा समोर आला होता. मी टक्कर मारू का?’ आता हे ऐकून कर्णधार रोहित शर्माही मजेशीर मूडमध्ये आला आणि त्यानेही पंतला उत्तर दिले – मारून टाक, अजून काय.

टीम इंडियाचा विजय 

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहितसेनाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली. टीम इंडियाचे गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. 

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 171 रन्सचं आव्हान दिलं होते. मात्र  भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 17ओव्हरमध्ये 121 धावांवरच गुंडाळलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. तर डेव्हिड विलीने नाबाद 33 रन्स केल्या. मात्र तो टीमला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *