Headlines

VIDEO: लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पत्नी प्रिया बेर्डे यांना दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं? स्वत:चा केला खुलासा

[ad_1]

Laxmikant Berde Video: आपल्या चाहत्यांना भरभरूनं हसवणारे ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आज आपल्यात नाहीत त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde Viral Video) यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतून आपली अशी एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. त्यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत जे त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात आणि त्यांचे चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा आवडीनं पाहतात. त्यांच्या अभिनयाला दाद द्यायलाही आपण विसरत नाही इतके लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यांचा ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi hi Banwa Banwi) हा चित्रपट आपण हजार वेळा तरी पाहिला असेल आणि आज 2023 मध्येही आपण तो आवर्जून पाहतो. लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाऊन आज 19 वर्षे होत आली आहेत परंतु त्यांच्या आठवणी आजही आपल्या सगळ्यांच्या मनात ताज्या आहेत. (VIDEO Vetern Actor Laxmikant Berde video goes viral where he speaks about his first gift to her wife priya berde)

लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यामध्ये त्यांची मुलाखत (Laxmikant Berde and Priya Berde Interview) पाहायला मिळते आहे. हा व्हिडीओ ‘झी मराठी’ (Zee Marathi) वाहिनीवर लागणाऱ्या म्हणजे पुर्वीच्या ‘अल्फा मराठी’ चॅनलवर लागणाऱ्या ‘जॉडी नंबर वन’ या कार्यक्रमातला आहे. ‘जोडी नंबर वन’ हा रिएलिटी शो त्यावेळी खूप लोकप्रिय झाला होता. त्याच्या एका एपिसोडमधील हा भाग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या एपिसोडमध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी जोडी नंबर वन म्हणून या कार्यक्रमात भाग घेतला होता. 

भेटवस्तू, प्रेम आणि बरंच काही

या क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) करताना दिसते आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लव्ह स्टोरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या एपिसोडमध्ये सुरूवातीला ते आपल्या नात्यातील काही किस्से सांगताना दिसतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रश्न विचारला जातो की त्यांनी त्यांची पत्नी प्रिया बेर्डे हिला पहिल्यांदा कोणती भेटवस्तू दिली होती.

प्रिया बेर्डेंना कोणतं पहिलं गिफ्ट मिळालं? 

यामध्ये रेशम टिपणीस लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारते की, ”तुम्ही प्रियाला पहिलं गिफ्ट कोणतं दिलं होततं?” त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात की, ”मी प्रियाला खूप गिफ्ट्स दिले आहेत.” त्यावर रेशम टिपणीस त्यांना बोलत करत विचारते की, ”नाही नाही, असं नाही. पहिलं कोणतं गिफ्ट दिलं ते सांगा ना”. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात की, ”मी प्रियाला पहिलं गिफ्ट म्हणजे सुंदर अशी साडी दिली होती”. त्यावर रेशम टिपणीस ”वा” असं म्हणते. 

हेही वाचा – RBI कडून मोठी अपडेट; आता ‘या’ 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचे चाहते या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची दोन्ही मुलं सिनेसृष्टीत सक्रिय (Swandani Berde) आहेत. अभिनय बेर्डेचा ‘ती सध्या काय करते’ (Abhinay Berde) हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *