Headlines

Video: भरधाव वेगातील स्कॉर्पिओ पुलावरुन वैनगंगेत कोसळली; चालकाचा जागीच मृत्यू, खिडकीची काच फोडून बाहेर काढला मृतदेह | Scorpio accident car fall in wainganga river driver died on the spot video rno news scsg 91

[ad_1]

चंद्रपूरवरून आष्टीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. कठडा तोडून स्कॉर्पिओ गाडी वैनगंगा नदीच्या पात्रात पडली. या अपघातामध्ये वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. रात्री उशीरी चालकाचा मृतदेह आणि गाडी नदी पात्रातून बाहेर काढण्यात प्रशासनाला आणि पोलिसांनी यश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार एमएच २० डिव्ही ३७११ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरील कठडे तोडून नदीपात्रात कोसळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. सध्या वैनगंगा नदीला पाणी भरपूर आहे. कठडे तोडून हे वाहन पाण्यात कोसळल्यानंतर ते पाण्यात पूर्णपणे बुडाले होते. ही नदी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा असल्यामुळे घटनास्थळी आष्टी आणि गोंडपिपरी अशा दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोहोचले होते. हा अपघात झाल्यानंतर दोन तास या पुलावरील वाहतूक ठप्प होती. काच फोडून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.

चालकाचा मृतदेह रुग्णवाहिकेने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. ही घटना गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी गोंडपिपरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्यासह पोलीस ताफा होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूला ट्रकची रांग लागलेली होती. जवळपास दोन तास वाहतूक टप्प होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *