Headlines

VIDEO: “आम्ही दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला, पण…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान | Big statement of VBA chief Prakash Ambedkar about alliance with Congress Shivsena

[ad_1]

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबत मोठं विधान केलं. “आम्ही काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला आहे, पण अजून त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही आमची जेवढी चादर आहे तेवढे हातपाय पसरतो. तेवढाही न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या पक्षांबरोबर का जाऊ,” असं सूचक विधानही त्यांनी केलं. ते बुधवारी (१२ ऑक्टोबर) अमरावती दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही आमची मतं किती हे लोकसभेत दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्ही आमची चादर पाहतो आणि तेवढेच पाय पसरतो. आता आम्ही आमच्या चादरीप्रमाणे पाय पसरणं अनेकांना आवडत नाही, पचत नाही. आम्ही गवईंप्रमाणे राजकारण करत नाही. मिळालं तर ठीक, ‘सीट ऑर नो सीट, वोट फॉर काँग्रेस’ अशी भूमिका आमची नाही.”

“तेवढाही न्याय मिळत नसेल तर इतर कोणाही बरोबर आम्ही का जावं?”

“आमचं म्हणणं आहे की जेवढी आमची चादर आहे तेवढ्या आम्हाला जागा मिळाव्यात. तेवढाही न्याय मिळत नसेल तर इतर कोणाही बरोबर आम्ही का जावं?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला.

“सावंत माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “सावंतांनी स्वागत करू असं म्हटलं आहे. सावंतांना माहिती आहे की ते माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे ते स्वागत करत असतील. त्यांच्या पक्षाने कुठं स्वागत केलं आहे. व्यक्ती आणि पक्ष हे वेगळे आहेत. त्यांच्या पक्षाने म्हटलं पाहिजे की आम्ही युती करायला तयार आहोत, मग आम्ही त्याचं उत्तर देऊ.”

हेही वाचा : काँग्रेस वंचित आघाडीसोबत युती करणार? नाना पटोले म्हणाले, “आम्हाला कोणाबरोबरही…”

“आम्ही दोन पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत”

“वंचितच्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महिनाभरापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत सांगितलं होतं. आम्ही दोन पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत. एक काँग्रेस आणि दुसरा शिवसेना. मात्र, दोघांकडून अद्याप कसलंही उत्तर आलेलं नाही,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *