Headlines

Video : 16 वर्षाच्या सलमान खानसोबत असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलतं का?

[ad_1]

जॅकी श्रॉफची (jackie shroff) पत्नी आणि टायगर श्रॉफची (tiger shroff) आई आयेशा श्रॉफ ( Ayesha shroff) यांनी एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. श्रॉफ कुटुंबातील आई आयेशा श्रॉफ देखील अभिनेत्री आहेत. आता आयशा यांनी चाहत्यांसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. आयश श्रॉफ यांनी कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत सलमान खानही (salman khan) दिसत आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने नुकतीच इंडस्ट्रीत आपली 34 वर्षे पूर्ण केली. सलमान खानचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. पण  हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सलमान खानने या कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीसाठी काम केलं होतं. आयेशा श्रॉफ देखील या जाहिरातीचा भाग होत्या. त्यांनी 1983 मध्ये शूट केलेल्या विंटेज जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये, आयशा श्रॉफ आणि सलमान खान यांच्यासह  सुनील निश्चॉल, शिराझ मर्चंट, व्हेनेसा वाझ आणि आरती गुप्ता हे त्यावेळचे टॉप मॉडेल्स होते. तेव्हा सलमान तरुण होता. व्हिडीओमध्ये आयशा आणि त्यांच्या मैत्रिणी यॉटवर आहेत. सर्वजण कॅम्पा कोला कोल्ड्रिंक पीत आहेत. यादरम्यान ते बोटीतून एक एक करून समुद्रात उडी मारतात आणि पोहतात. जाहिरातीतील काही शॉट्स हे अंदमानमध्ये शूट करण्यात आले होते.

हा व्हिडिओ शेअर करत आयेशा यांनी , ‘जेव्हा आयुष्य खूप साधे आणि मजेदार होते. ते परत येत आहे हे ऐकून आनंद झाला. अंदाज लावा कोण आहे, असे कॅप्शन दिलं आहे. त्यावर दिशा पटानीने  या व्हिडिओवर, ‘तू खूप क्यूट दिसत आहेस, अशी कमेंट केली आहे. याशिवाय सुनीता कपूर, संदीप खोसला आणि इतरही पोस्टवर व्यक्त झाले आहेत.

सलमानची पहिली जाहिरात

कॅम्पा कोलाच्या जाहिरातीसाठी सलमान खान पहिल्यांदा कॅमेरासमोर आला होता. 1998 मध्ये आलेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. यामध्ये तो सहाय्यक भूमिकेत होता. मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला हिट चित्रपट ‘मैने प्यार किया’ होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *