Headlines

VIDEO: ”मला जाऊ द्या, मुलांना शाळेत सोडायचंय!” नाईलाजानं Shahid Kapoor च्या पत्नीनं कोणाला सुनावलं?

[ad_1]

Mira Rajput Video: फोटोग्राफर्स हे नेहमीच सेलिब्रेटींच्या मागे लागले असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ढवळाढवळ करायचे प्रयत्न करत असतात. परंतु यावेळी शाहीद कपूरच्या बायकोनं चोख उत्तर दिलं आहे. बॉलिवूडमध्ये एक चित्रपट हीट झाला की एकतर कलाकारांच्या (Shahid Kapoor Wife) डोक्यात तरी हवा जाते नाहीतर त्यांच्या मागे मागे फिरत त्यांचे प्रत्येक फोटो टिपण्यासाठी आतुर असलेले फोटोग्राफर्ससुद्धा त्यांचे जगणं मुश्लिक करून सोडतात.

यावेळी स्मितभाषेतून बोलून शाहीद कपूरच्या पत्नीनं मीरा राजपूतनं मौक्यावर चौका मारला आहे. नक्की तिनं असं काय केलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ती एका कार्यक्रमानंतर घरी जाताना दिसते आहे. (shahid kapoor wife mira rajput reaction after paparazzi runs behind her watch video)

नटून थटून मीरा एका कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसते आहे. तेव्हा तिला गाठत तिच्या मागे मागे पापाराझीही आले त्यांना मात्र ती रोखू शकली नाही. परंतु अरे मला जाऊ द्या; उद्या सकाळी माझ्या मुलांना शाळेत सोडायचे आहे. अशा केविलवाण्या भाषेत तिनं पापाराझींना विनवणी केली आहे. मीरा राजपूत (Mira Rajput Spotted) ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्यातून तिचेही फॅन फॉलोईंग खूप तगडं आहे. शाहीद कपूरसोबत अनेकदा ती विविध कार्यक्रमांना स्पॉट होताना दिसते. त्यामुळे मीराही फार चर्चेत असते. 

यावेळी मीरा एका कार्यक्रमातून घरी जाताना दिसते आहे. तेव्हा तिच्या मागे मागे पापाराझी (Mira Rajput Trolled) येतात तेव्हा त्यांना ती टाळायचा प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात ती त्यांना म्हणते, ”मला जाऊ द्या, सकाळी मुलांना शाळेत सोडायचे आहे.” असं म्हणताच ट्रोलर्सन मीरालाही सुनावलं. 

हेही वाचा – वय, वेळ आणि निळू भाऊ…; मिलिंद गवळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

एका युझरनं म्हटलंय की, ”अरे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत यावेळी कुठे शाळा?” तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय की, ”मुलांची एवढीच काळजी आहे तर मग हाऊसफाईफचं राहायचंस”, तर एकानं लिहिलंय की, ”उन्हाळ्याच्या सुट्टीत  शाळा घेणारी ही कोणती शाळा आहे?” हा व्हिडीओ कालचा आहे तेव्हा काहींना म्हटलंय की, ”उद्या म्हणजे शनिवारी कुठली शाळा असते?” तर काहींना उगाच अॅटिट्यूड आणि नोटंकी करतेय असं म्हणलंय.

यावेळी मीरानं हटके लुक कॅरी केला होता. ज्यात तिनं झेब्रा पॅटर्न किंवा मोनोक्रुमचा ड्रेस परिधान (Mira Rajput Monochrome Dress) केला आहे. तिचा टॉप हा या स्टाईलचा होता तर तिचा स्कर्ट पांढऱ्या रंगांचा होता. तिनं लांब कानातले घातले होते आणि केशरचनाही साधीच ठेवली होती. यावेळी ती एका हॉटेलमधला दिसतो आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *